Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ मे, २०२१

कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या 12 गायींची सुटका करण्यात पोलिसांना यश..!



शिरपूर प्रतिनिधी:पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या 12 गायींची सुटका करण्यात यश पोलिसांना मिळाले आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गवर कारवाई करत आयशर जप्त करण्यात आली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपीनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संझिप मुरकुटे,आर.ए मोरे,पोना.हेमंत पाटील,एम.डी.सपकाळ,
पंडीत मोरे आदींनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका येथे सापळा रचला असता Rj 31GA 9961या क्रमांकाच्या आयशरला टोलनाका येथे पोलिसांनी थांबवले असता.

चालक मोहम्मद अशरद कुरशेद खान वय 25 रा.हनुमानगढ राजस्थान व साथीदार मुबारक फारुक खान वय 26 रा.यांची चौकशी केली असता आयशच्या मागच्या बाजुस 12 गायींना निर्दयतेने आखुड दोरीने बांधलेल्या अवस्थेत मिळुन आली.पोलिसांनी 5 लाख 82 हजार किंमतीच्या 12 गायींची सुटका करत आयशर ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह शिरपूर पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे 12 गायींची सुटका अखिल भारतीय गौरक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र पाटील धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश बिरारी कुणाल राजपूत यांनी परिश्रम घेतले यामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध