Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ मे, २०२१

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भामरेचा वाढदिवस सर्वच स्तरातुन शुभेच्छाचा वर्षाव...!



प्रतिनिधी कापडणे- धुळे तालुक्यातील कापडणे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दिवाण भामरे हे गुप्त समाज सेवक म्हणुन ओळखले जातात ते कधीच प्रसिद्धी साठी कोनत काम करत नाहीत स्वता नोकरदार असुन देखील समाजा प्रती असनारी तळमळ ही राजेंद्र भामरे च्या ह्रुद्ययात कायम असते,ते कायम अडल्या नडल्याला निस्वार्थ पने मदत करत असतात त्यानी अनेक माय मावल्यानां संसाराला लावले आहे जसेकी सासु सासरे त्रास देतात नवरा दारु पीतो याला कंटाळुन संसार मोडन्याच्या मार्गावर असनार्या माय मावल्याच्या समस्या जानुन घेत दोन्ही पार्टीनां एकत्र बसउन समजुत काढत परत हसतस खेळत संसार करन्या साठी नेहमी अग्रेसर असतात म्हणुन राजेंद्र भामरे यांचा संपर्क खुपच दांडगा झाला आहे. 

वेळ पडेल तेव्हा पडीत वंचित घटकांन साठी मदती साठी धाउन जातात म्हणुन पोलीस,पत्रकार,राजकीय मंडळी,उद्योजक,कर्मचारी,डॉक्टर,यांच्यात आबासाहेब या नावाने वेगळी असी ओळख निर्माण केली आहे म्हणुन आज 25 मे रोजी आबासाहेबांचा वाढदिवस असल्याचे समजताच सर्वच क्षेत्रातील मंडळी एकवटले व कोरोना महामारी लक्षात घेता छोट्याखानी वाढदिवस साजरा करन्या चे आयोजन करुन केक कटींग करुन वाढदिवस साजरा करन्यात आला, 

यावेळी  उपस्थित सोनगीर पोलीस स्टेशन चे साय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पाटील साहेब,पोलीस उपनिरिक्षक नामदेव सारे साहेब,पोलीस उपनिरिक्षक निकाळजे साहेब,विशाल सोनवणे,अतुल निकम,स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे धुळे जिल्हा महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी चे धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान भाऊ देवरे युवा दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.गौतम पगारे, संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीकांत सरदार,साप्ताहीक खलाणे टाईम्स चे संपादक जितेंद्र दादा वाल्हे,सामाजिक कार्यकर्ते रहुफ पींजारी,रमेश भामरे,संतोष तात्या पारधी,प्रफुल्ल भामरे,पींटु चौधरी,या सह राजेंद्र भामरेचां मीत्रपरिवार मोठ्या संख्खेने उपस्थीत होता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध