Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ मे, २०२१
नॅशनल मोबाईल मेडीकल युनिट तर्फे बोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगाव येथे आज केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक आरोग्य विभाग 'नॅशनल मोबाईल मेडीकल युनिट' तर्फे बोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
नॅशनल मोबाईल मेडीकल युनिट (स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय) मार्फत पहिल्या फेरीत तालुक्यातील 48 गावांत जाऊन गावातील गरोदर महिला, लहान मूल, वृद्ध स्त्री पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत.
बोरगावातील ग्राम पंचायत कार्यालयात गावातील ग्रामस्थांची बीपी, डायबिटीज व इतर आरोग्य तपासण्या डॉ डी एस पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. यावेळी गावातील 3 गरोदर महिलांचीही तपासणी करण्यात आली तसेच सर्वांना मोफत औषधी देखील देण्यात आली.
गावातील ज्या ग्रामस्थांना आज मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेता आला नाही त्यांची पुढील महिन्यात तपासणी करण्यात येईल असे मोबाईल मेडिकल युनिट मार्फत सांगण्यात आले.
यावेळी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, पोलीस पाटील मनोहर पाटील, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, माजी सरपंच रघुनाथ कोळी, कौतिक येशी, विठ्ठल कोळी, गोरख न्हावी, आनंदसिंग राजपूत, गुलाब भिल, पत्रकार अमोल राजपूत इ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा