Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे ऐ काय ? शिरपूर मर्चंट बँकेच्या विरोधात बातमी लावने पत्रकाराला पडले महागात..!
अरे बापरे ऐ काय ? शिरपूर मर्चंट बँकेच्या विरोधात बातमी लावने पत्रकाराला पडले महागात..!
शिरपूर प्रतिनिधी :शिरपुर शहरातील मर्चंट बँकेच्या विरोधात बातमी छापल्या प्रकरणी येथील दैनिक समाज शक्तीचे संपादक ईश्वर बोरसे यांना मर्चंट बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.पुन्हा मर्चंट बँकेच्या विरोधात बातमी छापल्यास पाय तोडून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. याप्रकरणी ईश्वर बोरसे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरात स्थानिक दैनिक वर्तमानपत्र असलेल्या समाज शक्तीचे संपादक ईश्वर बोरसे यांनी सोमवारी शहरातील मर्चंट बँकेच्या विरोधात भ्रष्टाचार संदर्भात बातमी छापलेली होती. यासंदर्भात ईश्वर बोरसे सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वर्तमानपत्र वाटप करीत होते.यावेळी शहरातील अलंकार चित्रपटगृहा जवळ दोन दुचाकीवर चार जण आले. त्यांनी बोरसे यांना तु मर्चंट बँके विरोधात पेपर मध्ये मजकूर का छापला ? आम्ही तिथले कर्मचारी आहोत.बँक बंद झाली तर आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे असे सांगितले.त्यानंतर बोरसे यांनी बँकेत भ्रष्टाचार झाला आहे.
त्यात तुमचा काय संबंध नाही.तर मग म्हणून तुम्ही घाबरतात का ? असे सांगितले.यानंतरही त्या कर्मचाऱ्यांनी बोरसे यांना परत बँकेच्या संदर्भात बातमी छापल्यास हात – पाय तोडेन व खोटा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी धमकी देत धक्का-बुक्की केली.
याप्रकरणी ईश्वर बोरसे यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात मर्चंट बॅंकेचे कर्मचारी संजय कुलकर्णी,गोपाल गुजराथी व एक नाव माहित नाही यांच्याविरुद्ध शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे.या कर्मचाऱ्यांनी ईश्वर बोरसे यांना दमदाटी करत धक्काबुक्की केलेली आहे.त्यामुळे बोरसे यांनी गुन्हा दाखल करून त्यांच्या पासून जिवाला धोका असल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा