Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० मे, २०२१
लोहारा कुसूंबा शेती शिवारात झन्ना मन्ना खेळतांना तिघांना अटक
जळगाव प्रतिनिधी (हमीद तडवी) सावदा पोलीस ठाण्याअंतर्गत सावदा पोलिसांनी काल संध्याकाळच्या सुमारास ५ वाजता झन्ना मन्ना नावाचा ५२ पत्ताचा खेळ खेळतांना लोहारा शेतीशिवारात तिघांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या कारवाईत ८ ते १० जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या लोहारा ता रावेर येथे रविवार ९ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कुसूंबा राोडने असलेल्या कुसूंबा लोहारा शेती शिवारात झन्ना मन्ना नावाचा जुगारचा खेळ खेळला जात असे,वेळोवेळी सावदा पोलीस तपास करीत धाड टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होऊन अखेर काल ९ मे रविवारी सातपुडा जंगल किनारी शेती शिवारात जलालशा बाबा दर्गाच्या जंगल किनारी बाजुस 52 पत्यांचा झन्ना मन्ना नावाचा पैसे खेळण्याचा जुगार खेळ खेळतांना काही व्यक्ती आढळुन आलेत.सावदा पोलीस पथक घटनास्थळी दाखल होताच खेळणारे ८ ते १० आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झालेत.
तर तिघांना पकडण्यात यश आले.यात तोशिफ शेख मोहम्मद वय ३० रा.नागझिरी),राजेंद्र रोहिदास वाघ वय ४० (रा उटखेडा) व मनोज जयराम महाजन वय ४० (रा.निंबोल) यांना अटक करण्यात आली.या पकडलेल्या आरोपींकडुन ११हजार ८७० रुपये रोख तर १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली अशा एकुण १ लाख २१ हजार ८७० रुपये व जुगाराचे साहित्य मिळुन आले.सहाय्यक पोलीस निरिक्षक देविदास इंगोले यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा पुढील तपास पो हे कॉ युसूफ तडवी करीत आहे.ह्या गुन्ह्याचा पुढील कारवाईचा तपास सपोनि इंगोले यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र पवार,युसूफ तडवी,सुनिल कुरकुरे,मोहसीन पठाण,विशाल खैरनार तपास करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा