Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ मे, २०२१

येळी येथे छत्रपती संभाजीराजे व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी...

उमरगा (राहूल शिंदे) दि.14 तालुक्यातील येळी गावांमध्ये छत्रपती शासन चौक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शंभूराजे व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून (सोशल डिश्टनशिंग, सिनेटायजर,मास्क) साजरी करण्यात आली.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामलिंग बिराजदार, रामभाऊ रेड्डी, विश्व मराठा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष बाबा पवार, आकाश राठोड, प्रमोद कांबळे, महेश सजगुरे, किरण भोसले, बाळू तेली,किरण मस्‍कले, बब्रुवान सजगुरे, संकेत कांबळे, बंटी बिराजदार, सुरज माळी, पवन पवार, ऋषिकेश माळी, बाळू सजगुरे, रायप्पा सजगुरे, रोहित देढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध