परंडा (राहूल शिंदे)दि.14 तालुक्यातील सक्करवाडी येथील रूग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ते तय्यब शेख यांनी रमजान ईदचा सण शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांसोबत साजरा करून समाजामध्ये एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
साधारणपने ईदच्या दिवशी नवीन वस्त्र परीधान करून, नमाज अदा करून मुस्लिम बांधव एकमेकांना अलिंगण देऊन शुभेच्छा देतात. पण, सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची सध्याची गरज लक्षात घेऊन कोरोनाचे सर्व नियम पाळत त्यांनी कोरोना संकटामध्ये कित्येकांसाठी देवदूत ठरलेले, कित्येकाचे जीव वाचवलेले डॉक्टर, नर्स, परीचारीका, आरोग्य सेवक यांचेसोबत ईद साजरी करण्यासाठी फराळाचे सर्व साहित्य बनवून आणून त्यांच्या वास्तव्याच्या ठीकाणी नेऊन देत त्यांना ईदच्या या आनंदाच्या क्षणात सहभागी करून घेतले.
गेल्या दिड वर्षापासून ना कोणता सण, ना कोणता उत्सव, ना कोणता आनंद! फक्त -फक्त आणि फक्त संघर्ष अन् तो ही कोरोना विषाणूविरूध्द. आणि हे संघर्षयोध्दे म्हणजेच आपले सर्व Front line Workers. हे सर्व एखाद्या योध्द्याप्रमाणे लढत असल्यानेच आज आपण घरामध्ये आनंदाने सण साजरे करू शकतो अशी भावना तय्यब शेख यांनी या वेळी व्यक्त केली.
आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. आणि कोविड योध्दयांसोबत साजरा केलेला आनंद हा कोरोना लढ्यासाठी सर्वांनाच निश्चितच प्रेरणादायक असा राहील अशी भावना यावेळी डॉ. भोसले यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रहार तालुकाध्यक्ष तय्यब शेख, डॉ. आदित्य पांडे, गवले सिस्टर, दादा गाढवे, भालचंद्र बोंडगे, अमोल अंधारे इ. उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा