Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ मे, २०२१

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निम्मित वृक्षरोपण करून केले अभिवादन वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम..!



शिंदखेडा- स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची 364 व्या जयंती निम्मित वृक्ष संवर्धन समिती शिंदखेडाच्या वतीने वृक्षरोपण, प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राज यांनी आपल्या काळात अनेक मोहिमा गाजल्या मात्र एकाही मोहिमेत त्यांना अपयश आले नाही.अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वराज्य टिकविण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज यांनी केले.

समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे, वृक्षप्रेमी, प्रचंड पराक्रमाने अजय संभाजी महाराजांच्या जयंती निम्मित वड, पिंपळ वृक्षाची लागवड करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी वृक्षसंवर्धन समितीचे योगेश चौधरी, भूषण मराठे, राजेंद्र मराठे,जीवन देशमुख, मोहन जाधव, रोहित कौठळकर, विनोद सोनवणे, अनिल मराठे, विजय चौधरी, संदीप चौधरी, प्रदीप चौधरी, सागर चौधरी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध