धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमनअभिजीत पाटील हे पंढरीचा पांडूरंगच साक्षात धावून आल्याचं समाधान वाटते. दाखवलेले हे धाडस खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. श्री.पाटील साहेब व पूर्ण संचालक मंडळ यांचे खूप खूप आभार..! -खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर
Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ मे, २०२१
धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन...
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.14 देशातील पहिला साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प यशस्वीरित्या धाराशिव साखर कारखान्यात उभा करून या ऑक्सिजन प्रकल्पाचा उद्घाटन शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला.
या शुभप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, उस्मानाबादचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी दिवेगावकर,शिखर बॅकेचे चेअरमन विद्याधर आनासकर , सदस्य.अविनाशजी महागांवकर,व्ही.एस.आय चे एस.व्ही.पाटील, मौज इंजिनिअरिंगचे ओकसाहेब, कागवाड, कारखान्याचे सर्व संचालक मंडळसह अनेक शासकीय अधिकारी या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
माधव खाबिया :- वडिवऱ्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2026 bNS 118[1] 351[2] आर्म act मधील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा