Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
भागवाताचार्य ह.भ.प.संध्याताई माळी यांच्या रसाळ किर्तन वाणीला झी टॉकीजवर मिळणार उजाळा !
भागवाताचार्य ह.भ.प.संध्याताई माळी यांच्या रसाळ किर्तन वाणीला झी टॉकीजवर मिळणार उजाळा !
अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र, गुजरात,मध्यप्रदेश अशा तीन राज्यात वारकरी संप्रदायाची धुरा खांदयावर घेत मुक्ताई,आईसाहेब जनाबाई ,सोयराबाई बहीणाबाई यांचा समृध्द वारसा जतन करणाऱ्या महाराष्ट्रातिल सुप्रसिद्ध महीला कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प.सौ. संध्याताई महाराज माळी सुरतकर (गुजरात)यांच्या रसाळ वाणीत प्रथमतःच झी टाँकीज या लोकप्रिय चँनलवर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कीर्तन मालिकेत दि.३ जुन ते ५ जून दरम्यान सकाळी ७ ते ९ या वेळेत सुश्राव्य कीर्तन होणार आहे,
याप्रसंगी त्यांचे चिरंजीव अत्यंत कमी वयात उत्कृष्ट मृदुंगाचार्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव गाजवत असेलेले उमदे व्यक्तीमत्व ह.भ.प यज्ञेश महाराज माळी हे आपल्या आईच्याच कीर्तनाला पखवाजवादनाची साथ देऊन कीर्तन सोहळा गाजविणारआहेत.ह.भ.प.संध्याताई माळी ह्या महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष शिवाजी महाजन
(पत्रकार)यांच्या बहीण आहेत तरी महाजन यांनी झी टॉकीजचे लोकप्रिय मालिका गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या किर्तन मालिकेच्या सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा