Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
दहिवद येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत नमुना नं.५ नुसार बेरोजगार भत्ता लागू.
दहिवद येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत नमुना नं.५ नुसार बेरोजगार भत्ता लागू.
तरुण गर्जना ,अमळनेर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सद्या अमळनेर तालुक्यात मोठया प्रमाणात कामे चालू असल्याचे चित्र आहे .शासनाकडून या अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कामे सुरू व्हावीत यासाठी वेळोवेळी आदेश देखील दिलेले आहेत.
रोजगार हमीच्या मोठ्या प्रमाणात अमलबजावणी कामी शासनाकडून होत असलेल्या कारवाईत ग्रामीण पातळींवर कामकाज करत असतांना मोठा गैरकारभार होत असल्याचे चित्र अमळनेर तालुक्यात आहे .तालुक्यातील काही ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष कामकाज शून्य असतांना हजेरी पत्रक जोरात सुरु आहेत तर काही ठिकाणी फक्त फोटो शूट .असा सर्व गोंधळ तालुक्यात सुरु असून सर्व आलबेल असल्याचे भासवले जात आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गावांत कमीत-कमी तीन कामे सेल्फवर असणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन कुठल्याही ग्रामपंचायतीत होत नसल्याचे दिसून आले आहे. दहिवद गावांत देखील महात्मा रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत .त्यात बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड व संगोपनाचे कामे सुरू आहे मात्र त्यात देखील जनतेची दिशाभूल केली जात आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड व संगोपन करण्याकामी दोन पद्धतीने कामकाज करता येते .१) सामुहिक वृक्षलागवड व संगोपन २) बिहार पद्धतीने संगोपन व संवर्धन सामुहिक पद्धतीने वृक्ष संगोपन करत असतांना गावांतील काही कुटुंब व नागरिक काम करू शकतात.तर बिहार पद्धतीने लागवड करताना दोनशे झाडांसाठी एक कुटुंबाला जबाबदारी देण्यात येते.यातच गावांत राजकीय स्वार्थासाठी व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ग्रामीण जनतेची मोठी दिशाभूल होत आहे. जॉब कार्ड तयार करण्यासाठी पैश्यांची मागणी केली जात आहे .
दहिवद ग्रामपंचायत कार्यालयात काही मजुरांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मागणीचा अर्ज नमुना नंबर ४ सामुहिक अर्ज MGNREGA Operation Guidelines, Annex B2(i)/1A , Under Section (3)(i)& Para 9 of Schedule II of Central Act अंतर्गत ग्रामविकास अधिकारी श्री.संजीव सैंदाणे यांच्याकडे ७ मे २०२१ रोजी केली होती.त्यात ९ मे २०२१ ते २३ मे २०२१ पर्यंत अकुशल रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज सादर केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत अकुशल रोजगार पुरविणे अशक्य ठरले असल्याने कायद्यानुसार बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी मागणी करण्यात आलेली आहे.
दहिवद गावांत ग्रामपंचायतीकडून शंभर मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या गप्पा मारल्या जात असतांना मुळात बोटावर मोजले जाणाऱ्या लोकांना देखील रोजगार उपलब्ध होत नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बेरोजगार भत्ता लागू झाला आहे.यानिमित्ताने गावांतील ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभार चव्हाट्यावर आला आहे. दहिवद ग्रामपंचायतीला बेरोजगार भत्ता मजुरांना देण्याची नामुष्की समोर आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा