Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
धनुरचा योगेश सैदाणे नेव्हीत झाला भर्ती.सरपंच यांच्या हस्ते युवकासह माता-पितांचा सत्कार
धनुरचा योगेश सैदाणे नेव्हीत झाला भर्ती.सरपंच यांच्या हस्ते युवकासह माता-पितांचा सत्कार
. प्रतिनिधी धनुर : धुळे तालुक्यातील धनुर गावाचा युवक श्री.योगेश रमेश सैंदाणे या तरुणाने अनेक प्रयत्नांच्या पराकाष्टा करुन भारतीय नेव्ही दलात प्रवेश मिळवला आहे. नाभिक समाजातून असणारे सर्व सामान्य कंटुबातील व्यक्ती श्री. रमेश नथ्थु सैंदाणे यांचे ते सुपुत्र आहेत.
नेव्हीचे ट्रेनिंग पिरियड यशस्वीरित्या या तरुणाने पुर्ण केले असून लवकरच ते नेव्हीच्या माध्यमातून देशसेवेत दाखल होणार आहेत.भारतीय नाविक दलात निवडमुळे सदर तरुण गावातील तरुणांसाठी प्रेरणास्रोतही बनला आहे.
कारण आजपर्यंत आर्मीसह सैन्य दलात इतर विभागात काही तरुणांची निवड झाली आहे. मात्र " नेव्ही " दलात निवड होणारे योगेश सैंदाणे हे धनुर गावात पहिलेच तरुण ठरले आहेत श्री. रमेश नथ्थु सैंदाणे हे मुळ धनुर गावाचे रहिवाशी आहेत. गावासह पंचक्रोशीत कष्टाळू आणी मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित आहेत.उदरनिर्वाह साठी ते गुजरात राज्यातील सोनगढ येथे हल्ली स्थायिक आहेत.
योगेश च्या प्रयत्नांना प्रोत्साहन म्हणून धनुर लोनकुटे ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.सत्यभामाताई रोहिदास शिंदे यांच्या संकल्पनेतून या तरुणा सोबतच त्यांच्या माता-पितांचा ग्रा. पं.कार्यालयात समस्त पदाधिकारींच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ देत सत्कार करण्यात आला सदर सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थितीत धनुरचे लोकनियुक्त सरपंच सौ.सत्यभामा ताई शिंदे, उपसरपंच सौ.कमलताई पटेल, माजी उपसरपंच श्री. युवराज चौधरी सर,सर्व ग्रा. पं.सदस्य , योगेशचे वडील श्री. रमेश सैंदाणे,आई सौ.सैदाणे ताई,तर ग्रामस्थांपैकी विजय भामरे,माधव नवल सैंदाणे,अनंत नाटु खैरनार,दिपक टेलर,प्रविण श्रीधर पाटील , सुनिल सैंदाणे ,मोहन सुर्यवंशी,सुधीर पटेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा