Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० मे, २०२१
मानव अधिकार फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा पदी पल्लवी प्रकाशकर
अमळनेर प्रतिनिधी:शहादा येथील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या अवंतिका फाउंडेशनच्या संस्थापिका पल्लवीताई प्रकाशकर यांची नुसतीच मानव अधिकार फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा पदी निवड करण्यात आली,
त्यांची ही निवड मानव अधिकार फाऊंडेशनचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर व महासचिव सौ.सुनीता गोडसे यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली,मानव अधिकार फाऊंडेशन भारतचे नियम व आदेशाचे पालन करून समाजातील सर्व मानवी उत्पीडीत घटकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यास सदैव तत्पर राहील,तसेच आपल्या कार्यात एकनिष्ठ राहून संविधानिक व न्याय व्यवस्थेच्या नियमांनुसार योग्य ती मदत करेल व यामध्ये कोणत्याही मानवी अधिनियमाची पायमल्ली होवू न देता प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव नेहमी कटिबध्द राहील असे पल्लवी प्रकाशकर यांनी सांगितले त्यांच्या या निवडीबद्दल अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्ता शिवाजी महाजन(पत्रकार) यांनी शुभेच्छा दिल्यात,तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व मित्र परिवाराने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा