Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ मे, २०२१
खा.शरदचंद्र पवार यांचाकडे पत्राव्दारे मागणी..!
हॉटेल,बार व्यावसायिकांन सोबतच लाॅड्रीधारकांना ही वीज बिल, मालमत्ता करात सवलत द्यावी : प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी आपले कपडे धुलाई व प्रेस समाज बांधव सेवा म्हणुन जिवनभर करतील
शिरपूर प्रतिनिधी:वाढत्या कोरोना संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यात अनेक व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. हे पत्र वाचुन मला व्यक्तीगत फारच आनंद झाला. या पत्रा सोबतच पुन्हा मुख्यमंत्रीना एक पत्र लिहावे कि राज्यातील धोबी (परिट) समाजातील लाॅड्रीधारकांना हि वीज बिलात व मालमत्ता करात सवलत देण्यात यावी. असे पत्र राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांना परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी (दि.९ मे) रोजी ईमेलने पाठवले आहे. मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, विधानसभा विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री ना. अजित पवार, ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांना हि पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे कि जर आपण पत्र पाठवले तर या समाजावर व लाॅड्री व्यवसायिकांवर आपले फार मोठे उपकार होतील.
हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत आपणास अवगत केले. म्हणुन आपण मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. मात्र राज्यातील धोबी (परिट) समाज अतिशय गरीब आहे व रोज दिवसभर कपडे धुलाई व प्रेस करुन जिवन जगत आहेत हे आपण विसरलात म्हणुन मी आपणास धोबी (परिट) समाजातील लाॅड्री धारकांच्यावतीने अवगत व विनंती करतो की राज्यात लाॅड्रीधारक अडचणीत आहेत वीज बिल तसेच मालमत्ता कर ही भरु शकत नसल्याने फारच आर्थिक संकटात आहेत असे पत्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी पाठवले आहे.
अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांचा मार्गदर्शनाखाली पत्र पाठवण्यात आले आहे. समाजाला सरकारने कुठलेच आर्थिक पाॅकेज जाहिर केले नसल्याने किमान आपण आमच्या समाजाच्यावतीने लाॅड्रीधारकांना वीज बिलात व मालमत्ता करात सवलत मिळावी यासाठी मुख्यमंत्रीना पत्र पाठवुन व सवलत मिळवुन द्यावी जर आपल्यामुळे आमच्या समाज बांधवाना सवलत मिळाली तर आपले आमचा समाजावर फार मोठे उपकार होतील व असे झाले तर आपल्या पवार परिवाराचे कपडे धुलाई व प्रेस सेवा म्हणुन समाज बांधव जिवनभर करतील आपण आम्हाला ही सेवा करण्याची संधी द्यावी असे पत्र खा. शरदचंद्र पवार यांना परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी पाठवले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा