Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील धक्कादायक घटना..! विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या..!
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील धक्कादायक घटना..! विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या..!
मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा तरुण भावेश चव्हाण याची आत्महत्या भावेशच्या कुटुंबीयांना व मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार:- जयदिप लौखे-मराठे
धुळे(प्रतिनिधी):तालुक्यातील बोरकुंड येथील भावेश दिलीप चव्हाण या विद्यार्थी तरुणांने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली. तो शनिवारी सायंकाळपासून घरातून निघून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असून वडील शेतकरी आहेत. त्याला तीन बहिणी असून पैकी दोघींचे लग्न झाले आहे.
तो अतिशय हुशार होता. बीएस्सीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. दरम्यान मराठा समाजासाठी असलेले शैक्षणिक आरक्षण त्याला न मिळाल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. तर, त्याला न्याय मिळवून देणार, अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शंभुसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष तथा सकल मराठा समाजाचे युवानेते जयदिप लौखे-मराठे यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा