Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ मे, २०२१

चोपडा तालुका व्यापारी महामंडळ यांच्यातर्फे चोपडा तालुक्याचे तहसीलदार गावित यांना निवेदन..! सरसकट सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी



सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने व्यवसाय सुरु करण्याचा व्यापारी संघटनेने आग्रह धरला असून अत्यावश्यकच्या नावाखाली इतर व्यापाऱ्यांवर प्रशासन अन्याय करीत आहे.लॅाकडाऊनला दोन महिने होवून गेली आहेत.अत्यावश्यक सेवेतील वगळता इतर व्यापारी किती दिवस तग धरतील?याचा विचार झालाच पाहिजे या उद्देशाने व्यापारी महामंडळ एकजूटीने प्रयत्न करत आहे.

जीवनावश्यक सेवा मधील दुकानावर सकाळी 7:00 ते 11:00 सुरू आहे परंतु सदरील वेळ सर्वाना गैरसोयीची असुन
त्यावेळेत बदल करून सरसकट सर्व प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या दुकानांना पण परवानगी सकाळी 8:00 ते दुफारी 1:00 वाजेपर्यंत देण्यात यावे

यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव,सल्लागार अनिल वानखेडे,संजय कानडे, उपाध्यक्ष सुनील बरडिया,श्याम सोनार,सचिव राजेंद्र जैन, प्रवीण जैन, नरेंद्र तोतला, प्रफुल स्वामी, विपिन बरडिया, सुंदरलाल सचदेव,संजय जैन, आदेश बरडिया,दिपक राखेचा,महाविर जैन,सिद्धार्थ पालीवाल,रवि अनंदाणी,सचिन जैन महामंडळाचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध