Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
शेगाव शहरातील भुगटारीचे काम पूर्ण झाले.खोदलेल्या रस्ताचे दुरुस्तीचे काम ही त्वरित पूर्ण करा:स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा.
शेगाव शहरातील भुगटारीचे काम पूर्ण झाले.खोदलेल्या रस्ताचे दुरुस्तीचे काम ही त्वरित पूर्ण करा:स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा.
शेगाव :प्रतिनिधी (उमेश राजगुरे)
शेगाव शहरामध्ये जीवन प्रादीकारण मार्फत (M.J.P) भुयारी गटारीचे काम सुरु होते.
ते काम आता पूर्ण होऊन बरेच महिने लोटले आहे.भुयारी गटारीचे काम करीत अस्तानां खूप खोलवर रस्ता खोदावा लागत असल्या मुळे.जुना डाबरी रस्ता हा पूर्णत खराब होऊन कच्चा रस्त्या समान होतो.
शेगाव शहरातील विविध ठिकाणी भुयारी गटारीचे काम चालु होते. या भुयारी गटारी मुळे शेगाव शहरातील नागरिकांना फायदाच झाला आहे. त्यात काही शंका नाही परंतु डाबरी रस्त्या खोदल्या मुळे शहरत विविध ठिकाणी कच्चा रोड तयार झाला आहे.
M.J.P मार्फत भुयारी गटारीचे जे काम शेगाव शहरात करण्यात आले आहे. त्या कामाचे जीवन प्रदिकारण नगर परिषदेने काम पूर्ण केल्या नंतर पूर्ण पैसे (मोबदला) अदा करते. तरी सुद्धा नगर परिषद कळून M.J.P. ने खोदुन बुजून ठेवलेल्या रस्ताचे दुरुस्तीचे काम अदयाप पर्यंत केले नाही.
त्या मुळे शहरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आता तर मान्सून ची चाहुल लागली आहे. पावसाळा काही महिन्या वर्ती येऊन ठेपला आहे.
रस्त्याचे डाबरी कारण न झाल्याने रस्त्याला कच्चा रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नगरपरिषदे कळून रस्त्याचे काम करण्याकरिता होत असलेल्या दिरंगाई मुळे या रस्त्यावरती छोटे मोठे अपघात होत असतात. शेगाव शहरातील भुयारी गटारीचे काम झालेने आहे.
आता त्वरित रस्त्याचे डाबरी कारन करावे अन्यथा नगर परीषद शेगाव हया आपल्या कार्यलया वर्ती स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण नोद घ्यावी अश्या तरेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कळून देण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा