Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जुलै, २०२१

उद्या शिरपूर येथे करवंद रस्त्यावरील शकुंतला लॉन्स येथे "ओबीसी आरक्षण पे चर्चा" कार्यक्रम विभागीय अध्यक्षतेखाली होणार आहे तरी मोठ्या संख्येने ओ.बी.सी बांधवानी उपस्थित रहावे



अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शिरपूर तालुक्याच्या वतीने परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष सन्माननीय श्री.बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष.आबासो.
राजेश बागुल यांच्या मार्गदर्शनाने गुरुवार दिनांक 15.7.2021 रोजी सकाळी 10.00 वाजता करवंद रस्त्यावरील शकुंतला लॉन्स येथे "ओ.बी.सी. आरक्षण पे चर्चा" विषयी बैठक आयोजित केली आहे. 

सर्व ओ.बी.सी. समाज घटकातील जाती व संघटनांच्या प्रमुखांनी उपस्थित रहावे ही विनंती. 

अ.भा.माळी महासंघ, महाराष्ट्र माळी महासंघ, खान्देश माळी महासंघ, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, चौधरी समाजाध्यक्ष, वाणी समाजाध्यक्ष,बडगुजर समाजाध्यक्ष, सुतार समाजाध्यक्ष,धोबी समाजाध्यक्ष, नाभिक समाजाध्यक्ष,शिंपी समाजाध्यक्ष, सोनार समाजाध्यक्ष,परिट समाजाध्यक्ष, अन्सारी समाजाध्यक्ष,मण्यार समाजाध्यक्ष, खाटीक समाजाध्यक्ष इत्यादी मान्यवर बैठकीस उपस्थित राहून आपल्या आरक्षणाच्या न्याय्य हक्कासाठी चर्चेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अखिल भारतीय माळी महासंघ शिरपूर तालुका महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा युवक आघाडी शिरपूर तालुका
महाराष्ट्र माळी महासंघ शिरपूर तालुका
सावता परिषद शिरपूर तालुका व शहर
व धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील समस्त ओ.बी.सी समाज संघटना

उठ ओ.बी.सी जागा हो, आरक्षणाचा धागा हो..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध