Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १५ जुलै, २०२१

शेळगाव येथे कृषिकन्येचे ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत ..


परंडा (राहूल शिंदे) दि.14 तालुक्यातील शेळगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय विळदघाट येथील कृषी कन्याचे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्य अनुभव कार्यासाठी आलेल्या कृषी कन्याचे स्वागत शेळगाव ग्रामस्थांनी केले या वेळी कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली कृषिकन्या जगताप वर्षा शहाजी हिने गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून गावाविषयी माहिती संकलित केली

covid-19 प्रार्दुभाव व त्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्या संदर्भात ही चर्चा करण्यात आली कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतातील माती परीक्षण फळबाग लागवड एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बीज प्रक्रिया शेतातील अवजारांचा वापर शेतीचे व आर्थिक नियोजन जनावरांचे लसीकरण आधी विषयांवर गावकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

तसेच विविध विषयावर प्रात्यक्षिके आयोजित करून आधुनिक तंत्राविषयी जनजागृती केली जाणार आहे कृषिकन्या जगताप वर्षा हिला महाविद्यालयाचे प्राचार्य एम डी धोंडे उपप्राचार्य एच.एल शिरसाट के.बी मोरे.ठोंबरे. शिरुरकर .मानकर दहातोंडे मॅडम व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे कृषी कन्याने सांगितले यावेळी सरपंच सौ सुलोचना विष्णुनाना शेवाळे उपसरपंच राजेंद्र दिगंबर जगताप ग्रामसेवक युवराज बिभीषण भोसले तालुका कृषी अधिकारी कैलास हरिदास देवकर शहाजी जगताप .गहीनाथ जगताप (मेजर) व ग्रामस्थ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध