Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जुलै, २०२१

7 नवउद्योजकांना 57 लाख 26 हजार रूपयांचे अनुदान वाटप..!



‘स्टँडअप इंडिया' योजना..! नवउद्योजकांना 15 टक्के अनुदान..!

केंद्र सरकारच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत नाशिक विभागातल्या मागासगर्वीय प्रवर्गातील 7 नव उद्योजकांना 57 लाख 26 हजार 700 रुपयांचे अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकूण 11 नवउद्योजकांचे अर्ज आले होते.
समाज कल्याण विभागाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाने छाननी करून नाशिक जिल्ह्यातील 3 अर्जदारांना 28 लाख 8 हजार 800 रुपये, अहमदनगर जिल्ह्यातील 4 अर्जदारांना 29 लाख 17 हजार 900 रुपये असे अनुदान वाटप करण्यात आले आहे. 

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15% रक्कम राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येत आहे. 

केंद्र शासनाने सन 2015  मध्ये ‘स्टँड अप इंडिया' ही योजना घोषित केलेली आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता 'मार्जिन मनी' देण्याचा निर्णय शासनाने घेतला. केंद्र शासनाच्या 'स्टँड अप' योजनेंतर्गत राज्यात सवलती घेण्यास पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्याना 'मार्जिन मनी' भरण्याची क्षमता नसल्याने त्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या जास्त पंधरा टक्के मार्जिन मनी' उपलब्ध करून दिला जातो. या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी जास्त जास्त अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध