Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जुलै, २०२१

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा सत्कार



शिरपूर  (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख उपस्थित मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिरपूर येथील भाजपा नेते तथा माजी उपसभापती नाशिक विभाग गृहनिर्माण क्षेत्र विकास (म्हाडा) महामंडळ बबनराव चौधरी यांची भारतीय जनता पाटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती जाहिर केल्याबद्दल बबनराव चौधरी यांचा शिरपूर येथील श्रीराम मंदिर येथे विश्व हिदु परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे फुलहार, शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. श्रीराम मंदिराचे महंत सतिषदास महाराज, ह.भ.प.प्रमोद महाराज यांच्या उपस्थितीत विश्वहिंदु परिषदेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य लक्ष्मिकांत जोशी,प्रखंड मंत्री वैभव भोंगे, प्रखंड सहमंत्री मनिष धाकड,नंदु चौधरी, सोनु चौधरी,बापू माळी,भाजपाचे मा.जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुका चिटणीस भाजपा सुनिल चौधरी, संजय आसापूरे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, दै.तरुण भारतचे प्रतिनिधी मनोज भावसार, जितेंद्र पाटील, मा.जिल्हा उपाध्यक्ष भाजपा भ.वि.मु.आघाडी बापू लोहार अनिल बोरसे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध