Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर पोलीसांत मनुष्य वधाचा (३०४ अ )गुन्हा दाखल कॉन्ट्रॅक्टर व घरमालकाचा बेजबाबदारपणामुळे निरापराध मजुराचा बळी
शिरपूर पोलीसांत मनुष्य वधाचा (३०४ अ )गुन्हा दाखल कॉन्ट्रॅक्टर व घरमालकाचा बेजबाबदारपणामुळे निरापराध मजुराचा बळी
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर येथील मयुर कॉलनीत म्युनिसिपल हायस्कुलचे शिक्षक आख्या फुगऱ्या पावरा यांच्या घराचे इमारतीचे बांधकाम खाजगी कॉन्ट्रॅक्टर नाना सहादु कोळी (वाल्मिक नगर) ह.मु.गिधाडे ता.शिरपूर यांचेकडे दिलेले होते. या घराचे काम सुरु असतांना संबंधीत कॉन्ट्रॅक्टर यांचेकडे बांधकाम मजूर म्हणून सुनिल मोतीलाल कातुरे (बारी) (वय ४५) यांनी दि.३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काम सुरु केले, मात्र काम सुरु करीत असतांना सदर काम दुसऱ्या मजल्यावर असल्याने सुरक्षा साहित्याची मागणी करुन कॉन्ट्रॅक्टरने ते उपलब्ध करून दिले नाही व सदर घरमालकाने संरक्षण म्हणून जाळीची व्यवस्था न करता बळजबरीने सदर काम करण्यास लावले अशी माहिती त्यांच्या पत्नीकडून प्राप्त झाली. त्यामुळे बिना सुरक्षा साहित्याविना व सुरक्षा जाळीविना काम सुरु असतांना सदर कामगार मजूर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्या मजूराच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचे सहकारी मजुरांनी त्यांना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले होते. असे असतांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाने याबाबत कोणताही गुन्हा दाखल करून न घेता त्यास धुळे येथील हिरे शासकीय रुग्णालयात हस्तांतरीत केले. हिरे शासकीय रुग्णालयातील डॉ.अरुणकुमार नागे यांनी त्यांस मृत घोषित केले. त्या नंतर संबंधीत मयत शवाचा पी.एम.केल्याने धुळे शहर पोलीस स्टेशनला साधा गुन्हा दाखल करून पुढील अंत्यविधीसाठी शव त्यांच्या वारसांच्या ताब्यात देण्यात आला.
मात्र अंत्यविधी व दशक्रिया कार्यक्रम संपल्यानंतर मयत मजुराची पत्नी रत्नाबाई सुनिल बारी यांनी दि.१२ रोजी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत भादविक ३०४ अ अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. संबंधीत घरमालक हे शासकिय कर्मचारी व शिक्षित असतांना बेजबाबदारपणे घराचे बांधकाम करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन येते, तरी कॉन्ट्रॅक्टर नाना सहादु कोळी व घरमालक शिक्षक आख्या फुगऱ्या पावरा यांच्यावर शिरपूर पोलीस पुढील कोणती कारवाई करतील व कधी याबाबत मयताचे वारस लक्ष घालुन आहेत.
तसेच याबाबत पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा