Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
राधाकृष्ण नगरीमध्ये घर घेण्यासाठी २०० पेक्षा अधिक लोकांनी स्वप्नातील घर घेण्याकडे पहिले पाऊल..!
राधाकृष्ण नगरीमध्ये घर घेण्यासाठी २०० पेक्षा अधिक लोकांनी स्वप्नातील घर घेण्याकडे पहिले पाऊल..!
स्माईल इन्व्हेस्टमेन्ट सर्विसेस (आय) प्रा. लि.आणि स्माईल हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रा. लि.ही कंपनी मौजे करवंद ता.शिरपूर येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राधाकृष्ण नगरी नावाने पहिल्यांदाच हप्त्याने आणि परवडणाऱ्या घरांचा एक भव्य प्रकल्प करत आहे. सदर प्रकल्पामध्ये शिरपूरवासीयांनी तसेच शिरपूर शहरालगतच्या बऱ्याच जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला आहे. राधाकृष्ण नगरीमध्ये घर घेण्यासाठी २०० पेक्षा अधिक लोकांनी कंपनीवर विश्वास दाखवत कंपनीचे भागधारक बनून आपल्या स्वप्नातील घर घेण्याकडे पहिले पाऊल टाकले आहे.
सदर प्रकल्पाबाबत सुवर्णनगरी शिरपूरचे सर्वेसर्वा मा. अमरिषभाई पटेल (माजी शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची कंपनीचे संचालक तसेच सल्लागार समितीच्या सदस्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने २० जुलै २०२१ मंगळवार रोजी भाईंच्या निवासस्थानी “जनक विला” बंगल्यावर सदिच्छा भेट घेऊन भाईसाहेबांना कंपनीच्या राधाकृष्ण नगरी प्रकल्पाबाबत सविस्तर माहीती दिली. त्याच ठिकाणी शिरपुरचे माजी नगराध्यक्ष श्री. भूपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाइल कंपनीचे संचालक श्री. चिंतनभाई पटेल तसेच माजी नगराध्यक्ष श्री. प्रभाकरराव चव्हाण यांची देखील भेट झाली. शिरपूर शहरात पहिल्यांदाच असा हप्त्याने आणि परवडणाऱ्या ६५० घरांचा प्रकल्प होत असून चर्चेत राधाकृष्ण नगरीत येणाऱ्या इस्कॉन मंदिरासोबतच इलेक्ट्रिक बस सुविधा, राधाकृष्ण सुपरमार्केट अशा दिल्या जाणाऱ्या सर्व सोईसुविधांबद्दल माहिती देण्यात आली.
संपूर्ण भेटीदरम्यान भाइसाहेबांनी राधाकृष्ण नगरी प्रकल्पासाठी शुभेच्छा देऊन सदर प्रकल्प अतिशय उल्लेखनीय असल्याचे सांगितले.तसेच आषाढी एकादशीचे औचित्य साधून कंपनीच्या खटाई प्लाझा, करवंद रोड येथील ऑफिससमोर भाविकांना केळी आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
राधाकृष्ण नगरीसाठी जागा करवंद गाव येथे निवडण्याचे कारण आर. सी. पटेल इंस्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्यूकेशन अँड रिसर्च, रिक्रिएशन गार्डन, सीबीएसई स्कूल, वॉटरपार्क, इंजिनिअरिंग कॉलेज, गोल्ड रीफायनरी, टेक्स्टाइल फॅक्टरी, एमआयडीसी, आयटीआय कॉलेज, बालाजी मंदिर, शिव मंदिर-दहिवद, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, शिरपूर बसस्थानक, शिरपूर विमानतळ, निम्स कॉलेज यांच्या जवळ असून नैसर्गिक आणि रम्य वातावरणात आहे. त्यामुळे राधाकृष्ण नगरीत घर घेणाऱ्या सर्व कुटुंबांना आणि गुंतवणूकदारांना सदर फ्लॅट्सचा भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल.
शिरपूर शहर चहूबाजूंनी पसरत आहे. त्यातच राधाकृष्ण नगरीच्या सुरुवातीने शिरपूर शहरात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ३ ते ४ वर्षात करवंद गाव शिरपूर शहराचाच भाग बनेल. शिरपूरला सिंगापुर बनवण्याचे भाईंचे स्वप्न सत्यात उतरायला कुठेतरी सुरुवात झाली असे सांगून चर्चेअखेर सर्वांनी राधाकृष्ण नगरीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर प्रकल्पाबद्दल शिरपूर तालुक्यातील सर्व सरपंच, डॉक्टर्स, मुख्याध्यापक यांनाही पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या काही दिवसातच करण्याचे कंपनीने ठरविले असून त्याबाबत लवकरच सूचित करण्यात येईल.
चर्चेत कंपनीचे मुख्य संचालक श्री. माधब चौधरी, संचालक श्री. केशब चौधरी, सौ. मनीषा पवार,श्री.देवेंद्र पाटील (दादा), श्री. संजीव पाटील,श्री.गोपाल बोरसे, कंपनीचे कायदेशीर सल्लागार अॅड.श्री.अमोल चौधरी,सल्लागार इंजि.श्री.विजयसिंग पाटील,प्राध्या.मनोज पाटील,प्राध्या. कमलेश कुरणकर, श्री. जितेश पवार सोबत कंपनीचे इतर कर्मचारी सौ. सुरेखा कुरणकर, सौ. वर्षा बडगुजर,जगदीश बोरसे, योगेश साळुंखे, राहुल चौधरी व श्री. महेंद्र बडगुजर आदी उपस्थित होते.
राधाकृष्ण नगरी प्रकल्पाबाबत अधिक माहितीसाठी कंपनीच्या
या संकेतस्थळाला किंवा ऑफिसला प्रत्यक्ष भेट द्या.
ऑफिसचा पत्ता – खटाई प्लाझा, कृष्ण व्हॅली समोर, करवंद रोड, शिरपूर. ता. शिरपूर. जि. धुळे.
फोन नंबर – ०२५६३-२९५८६३.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा