Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ जुलै, २०२१

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ( ICDS ) आयुक्त मॅडम, यांची संघटनेच्या अध्यक्षा.श्रीमती मायाताई परमेश्वर यांनी भेट



प्रतिनिधी: दिनांक 23 जुलै रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ( ICDS ) आयुक्त मॅडम, यांची संघटनेच्या अध्यक्षा. श्रीमती मायाताई परमेश्वर यांनी भेट घेतली. सर्वप्रथम नवनिर्वाचित आयुक्त यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आणि नंतर सध्या महत्त्वाच्या असणाऱ्या विविध मागण्यांपैकी
1)पोषण ट्रॅकर एप्लिकेशन मध्ये " मराठी भाषेचा " समावेश करण्यात यावा* ही मागणी केली.
2)अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे आणि जास्त क्षमतेचे मोबाईल देण्यात यावेत अशीही मागणी केली. 
          
या दोन्ही मुद्यांवर काम सुरू असून, तसा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठविला असल्याबाबत मा. आयुक्त मॅडम यांनी सांगितले. तसेच मागील अनेक मीटिंग मधून हा मुद्दा सातत्याने आम्ही चर्चेला घेतला असून, लवकरच या मुद्यावर मार्ग निघणार आहे असेही आयुक्त मॅडम यांनी सांगितले. 
          
मोबाईल मध्ये पोषण ट्रॅकर एप्लिकेशन मध्ये स्थानिक राज्यातील भाषेचा समावेश असावा असे आपल्या महाराष्ट्र राज्यासह अन्य गुजरात, छत्तीसगड, गोवा, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांची देखील हीच मागणी असल्याबाबत सांगण्यात आले. आणि केंद्राकडून लवकरच यावर योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली.
        
यामुळे लवकरच मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर एप्लिकेशन मध्ये मराठी भाषेचा समावेश करावा आणि नवीन  मोबाईल देण्यात यावेत या मागण्यांवर केंद्रातून निर्णय होईल आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर होतील. 
         
सदर प्रसंगी मा. आयुक्त यांच्यासह चर्चेला शिष्टमंडळात संघटनेच्या अध्यक्षा मा. मायाताई परमेश्वर, सौ. सुशीलाताई कोळी, श्री. सुधीर परमेश्वर यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध