Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

पर्यावरणाच्या रक्षणासाठी व ऑक्सिजन प्राणवायू प्राप्तीसाठी वृक्ष लागवड काळाची गरज..! आमदार अमरिशभाई पटेल..!



आ.अमरिशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते करवंद येथे श्री हनुमान मंदीर सभामंडप उटघाटन व ५००० वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ उत्साहात


शिरपूर : शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकत्रितरित्या काम करु या. पर्यावरणाच्या रक्षणासाठी व ऑक्सिजन प्राणवायू प्राप्तीसाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे. सर्वच गावात व शेतात झाडे लावा, ते जगवा. मी पुढील ३५ ते ४० वर्षांचा विचार करुन कोणतेही काम करतो. एकही झाड मरायला नको असा प्रयत्न सर्वांनी करावा. एस व्ही के एम संस्थेच्या शिरपूर कॅम्पस परिसरात हजारो वृक्ष लागवड केली असून एकूण २५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. शिरपूर पॅटर्न ३०० पेक्षा जास्त बंधारे आम्ही पूर्ण केले असून प्रत्येक बंधाऱ्यात १ कोटी ते १५० कोटी लिटर पाणी जिरवायचे काम सुरु आहे. थाळनेर जवळ बॅक वॉटर आणून भूजल पातळी वाढवली. पाण्याचे संवर्धन सर्वांनी करावे. अनेर धरणाचे पाणी तालुक्यासाठी आपण उपयोगात आणतोय. १२ नंबर चारी बंद पडली आहे. 


तिचे काम आपण सुरु केले आहे. पूर्वजांनी दिलेल्या संपत्तीचे संवर्धन करा. जीवनात थेट माणसाचे काम करा. आपण सर्व मिळून संपूर्ण तालुक्याला घडवू या. आपल्या एस. व्ही. के. एम. मुंबई व आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल मार्फत दरवर्षी असंख्य विद्यार्थ्यांना नोकरी मिळत आहे. आपल्या मुलामुलीकडे लक्ष देऊन त्यांना उच्चशिक्षित करा. पुढील काळासाठी आपण सर्व मिळून काम करु या असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.


तालुक्यातील करवंद येथे श्री हनुमान मंदीर सभामंडप (भक्तनिवास) उटघाटन व ५००० वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते श्री गोरक्षनाथ मंदीर येथे दि. २२/७/२०२१ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, एम. एस. भोसले (उपवनसंरक्षक, धुळे वनविभाग धुळे), माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, योगी अवधूत नाथसिंग महाराज, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शिरपूर साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाला सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी आनंद मिश्रा  शिरपूर, आनंदसिंग राऊळ, काशिनाथ राऊळ, लक्ष्मण पाटील, भाईदास पाटील, सुभाष कुलकर्णी, नारायणसिंग चौधरी, नाटूसिंग गिरासे, नितीन गिरासे, योगेश बादल, बाबुलाल माळी, रमण पावरा, अशोक जाधव, शामकांत ईशी, संजय चौधरी, भालेराव माळी, संजय पाटील, अरुण धोबी, राजेंद्र पाटील, भटू माळी मांडळ, उत्तमराव माळी, सुरेश पाटील, धनराज मराठे, प्रसन्न जैन, अशोक सोनवणे गरताड, विजय पारधी, गणेश सावळे, साहेबराव पाटील, अनिल गुजर, अविनाश पाटील, कृष्णा वाणी, सुधाकर पाटील, किशोर कुवर, नाना शिंपी, बी. एन. अहिरे, प्रेमसिंग राऊळ, जयसिंग राऊळ, भाईदास पाटील, मनोज वाणी, शिवदास वाणी, बंडू राऊळ, भैय्यम पाटील, धनराज पाटील, नामदेव अहिरे, नारायण पाटील, सलार गणी, आधार पाटील, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील म्हणाले,आ.अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी गावासाठी, गोरक्षनाथ मंदिर साठी पर्यावरणाच्या संवर्धन साठी ६ एकर जमीन वन खात्याकडून मिळवून दिली. सन स्टार कंपनी कडून २ हजार रोपे मिळाली. वृक्षारोपण मोहीम यशस्वीपणे सुरु राहील. गेल्या वर्षी भाईंनी करवंद धरणातून गाळ काढून दिला, त्यामुळे असंख्य पाण्याचे बोअर्स जीवंत झाले. पटेल परिवाराचे गावाच्या वतीने मनापासून आभार मानतो.

एम. एस. भोसले (उपवनसंरक्षक, धुळे वनविभाग धुळे)  म्हणाले, वन व वन्यजीव यासाठी काम करीत राहणे महत्त्वाचे. भाई यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उल्लेखनीय कामगिरी होत आहे. सर्वदूर पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक, प्राणवायू साठी वृक्ष लागवड महत्त्वाची, जनतेचा सहभाग महत्त्वाचा, कन्यारत्न प्राप्त पालकांना वन विभाग १० रोपे देत असून वृक्ष लागवड व संवर्धन साठी योगदान सर्वांनी द्यावे. प्रास्ताविक देवेंद्र पाटील यांनी, सूत्रसंचालन एम. जी. अहिरे यांनी केले. आभार बी. एन. अहिरे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध