Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ जुलै, २०२१

प्रहार अपंग क्रांती खामगाव तालुका व शहर यांच्या वतीने





प्रहार अपंग क्रांती खामगाव तालुका व शहर यांच्या वतीने प्रत्येक कार्यालयात जाऊन दिव्यांगांच्या अडचणी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विविध प्रश्न मार्गी लावण्यात आले या चर्चेच्या दरम्यान प्रहार अपंग क्रांती च्या जिल्हाध्यक्ष जयश्री गीते खामगाव तालुका अध्यक्ष किशोर मा होकार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रामभाउ बोरसे क्रांतीचे शहराध्यक्ष छत्रगुन इंगळे प्रहार अपंग क्रांती चे ज्येष्ठ मार्गदर्शक बिरोजा महिला तालुकाध्यक्ष प्रीती तिवारी शहर सचिव विजय श्रीनाथ व प्रहार अपंग क्रांती चे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होतेे.


यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती खामगाव निवासी व अधिकारी सामान्य रुग्णालय खामगाव मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय खामगाव या कार्यालयात जाऊन दिव्यांगांच्या अडचणी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून दिव्यांगांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध