Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ जुलै, २०२१
ऐतिहासिक वारसाचे जतन - मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थींनी वसतिगृह
सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून साकार झाली सुसज्ज,टोलेजंग इमारत...!
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतिगृहाची सुसज्ज, टोलेजंग इमारत मुलींच्या निवासासाठी सज्ज झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ४ कोटी २९ लाखांच्या निधीतून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी भाऊराव कृष्णराव गायकवाड उर्फ पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाची १९४१ साली स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतिगृहाचे विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी मग त्यांनी प्रत्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याहस्ते १९५४ मध्ये या वसतिगृहाच्या इमारतीचे भुमिपूजन केले. प्रत्यक्षात मात्र बांधकाम होवून हे वसतिगृह १ जूलै १९५६ रोजी सुरू झाले.
सुरूवातीला ७ मुलींच्या प्रवेशापासून किस्मतबाग येथे भाड्याच्या जागेत हे वसतिगृह सुरू झाले. सुरूवातीला काही वर्ष मुलींच्या भोजनाचा व शालेय साहित्याचा खर्च स्वत: दादासाहेबांनी केला. नंतर मुलींची संख्या वाढत गेली. त्यामुळे दादासाहेबांनी टिळकपथ, शालीमार भागात संस्थेच्या स्वत:च्या जागेत दगडी बांधकाम असलेली इमारत उभारली. सुरूवातीला ७ मुली नंतर २४ मुली, ५० मुली, १०० मुली अशी हळूहळू या वसतिगृहांची क्षमतावाढ होत आजच्या घडीला १८० मुलींना प्रवेश देण्याची क्षमता या वसतिगृहाची आहे.
सन २०१५ पूर्वी वसतिगृहाची इमारत जून्या पध्दतीत बांधलेली होती. १८० मुली बसतील असे भोजनगृह होते. ८ रूममध्ये मुलींच्या निवासाची सोय होती. त्यामुळे मुलींच्या निवासात मोठी अडचण निर्माण होत असे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने २०१५ मध्ये बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला. या निर्णयात संस्थेच्या १७६७ चौ.मीटर जागेत मुलींच्या वसतिगृहासाठी इमारत बांधकामांसाठी ४ कोटी २९ लाखांचा निधी मंजूर केला. प्रत्यक्ष बांधकामास २०१९ मध्ये सुरूवात झाली.२ वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तीन मजली इमारतीत मुलींच्या निवासासाठी २० रूम आहेत.प्रत्येक रूममध्ये ८ बेड आहेत. तर कार्यक्रम, उपक्रमांसाठी एक मोठा बहुउद्देशिय हॉल आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे. स्वयंपाकासाठी सुसज्ज किचन निर्माण करण्यात आले आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जतन ठेवण्याचं काम त्यांचे पुतणे तथा संस्थेचे सचिव पी.के.गायकवाड,उपाध्यक्ष रमेश गायकवाड, नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, सुधीर गायकवाड,अधीक्षिका बेबीताई डेर्ले गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे करत आहेत.
महान व्यक्तींच्या भेटी – वसतिगृह इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण बडोद्याचे महाराज फत्तेसिंग गायकवाड यांच्या हस्ते ६ जानेवारी १९६२ रोजी झाले. या वसतिगृहाचे उद्घाटन भारताचे तत्कालीक संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते ९ जून १९६३ रोजी झाले. या वसतिगृहाला भारताचे तत्कालीक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, लोकजनशक्ती पाटीचे तत्कालीक अध्यक्ष रामविलास पासवान, रिपब्लीकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, तत्कालीक सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भेटी दिल्या आहेत.
ऐतिहासिक दस्तावेजांचे जतन :- काळाराम मंदिर सत्याग्रहापूर्वी व सत्याग्रहानंतर लंडन येथे वास्तव्यास असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना लिहलेल्या एकूण ८ पत्रांचा संग्रह या वसतिगृहात जतन करून ठेवला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे खासदार असतांना त्यांनी अनेक विषयावर संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे केली होती. त्यांच्या सुमारे ६०० भाषणाचा संग्रह वसतिगृहात जतन करून ठेवण्यात आला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनमानातील महत्त्वपूर्ण घटनांचा सचित्र आढावा घेणारे ‘स्वतंत्र छायाचित्र दालन’ वसतिगृहांला भेट देणाऱ्या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.
वसतिगृहात प्रवेश :- मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थींनी प्रवेश दिला जातो. अनुसूचित जाती, जमाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींनी आरक्षणनुसार वसतिगृहात प्रवेश देण्यात येत असतो. निवास, भोजन, गणवेश आदी सुविधा विद्यार्थीनी मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
सध्या करोना आजाराच्या प्रार्दुभावामुळे वसतिगृह बंद आहे मात्र प्रवेश देण्याची प्रक्रिया चालू आहे. शासनाचे पुढील आदेश प्राप्त झाल्यावर वसतिगृह सुरू करण्यात येतील. अशी माहिती संस्थेचे सचिव पी.के.गायकवाड यांनी दिली.
सुरेश पाटील, जनसंपर्क अधिकारी,
प्रादेशिक उपायुक्त कार्यालय,
समाज कल्याण विभाग, नाशिक
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
-
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटा...
-
जळगाव जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृष...
-
चोपडा प्रतिनिधी : सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे याच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा