Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ जुलै, २०२१

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ.परिचारिका,वार्डबोय यांचा सत्कार




शिरपूर प्रतिनिधी:आज दी.२७ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ.परिचारिका,वार्डबोय यांचा सत्कार करण्यात आला.  
       
सविस्तर वृत्त असे की,उध्दवसाहेबांच्या आदेशानुसार वाढदिवस साजरा न करण्याचे आव्हान केले आहे त्या पार्श्भूमीवर एक अनोखा उपक्रम शिरपूर विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आला तो असा की , गेल्या COVID च्या महामारीचे संकट निवारण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा घेतला असे सर्व डॉ,परिचारिका,वार्डबॉय, लॅब टेक्निशियन, सफाई कामगार यांचा शाल , श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
   
यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री भरतसिंग राजपूत यांनी आभार व्यक्त केले यावेळी ते बोलले की,गेल्या कोरोनाच्या दोन लाटांमध्ये जे संकट निवारण्यासाठी जो मोलाचा वाटा घेतला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो व येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका ओळखता सर्व डॉ,परिचारिका , वार्डबॉय यांनी सज्ज राहून जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करावे अशे आव्हाहन दिले. या वेळी उपस्थित डॉ.ध्रुव राज वाघ, डॉ. योगेश अहिरे,डॉ.प्रसंजित ढवळे, डॉ. हिरेन पवार, डॉ. रचना मोरे,डॉ. नितीन निकम,डॉ.महेंद्र साळुंखे, अल्का राजपूत, ज्ञानेश्वरी खलाने, वैद्य सिसस्टर, गाडगीळ सिस्टर,गजेंद्र राजपूत Ambuelance ड्रायव्हर,निलेश वाडीले, मंजू वाडीले -सफाई कर्मचारी १०८ ड्रायव्हर विकास आदी उपस्थित होते.
           
यावेळी सत्कार करण्यासाठी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.भरातसिंग राजपूत, कमगरसेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच ज्येष्ठ शिवसैनिक राजू टेलर,शहर प्रमुख देवेंद्र पाटील,महिला आघाडी तालुका सांघटिका अर्चना देसले,श्री.तुषार महाले, दिनेश गुरव ,सतीश राजपूत,विकास सेन, करण राजपूत आदी शिवसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध