Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ जुलै, २०२१

रावेर येथे मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका माध्यमिक शिक्षकसेने तर्फे वृक्षारोपण



रावेर प्रतिनिधी दि.२७ जुलै रोजी सौ.कमलाबाई गर्ल्स हायस्कूल व ज्यु.काॅलेज रावेर येथे मा.ना.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवडा अभियानांतर्गत रावेर तालुका माध्यमिक शिक्षकसेना जिल्हा जळगाव  यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्राथ.नरेंद्र सपकाळे, शिक्षक सेना सरचिटणीस नाना पाटील,जळगाव तालुका शिक्षक सेना अध्यक्ष राजू पाटील,जळगांव जिल्हा शिक्षकसेना संपर्क प्रमुख नवलकुमार चौधरी,कमलाबाई गर्ल्स हायस्कूलचे प्राचार्य जयंत कुलकर्णी व रावेर तालुका माध्य. शिक्षक सेना अध्यक्ष मुबारक तडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

सदर कार्यक्रमास किरंगे सर,शिक्षकसेना तालुका सचिव गोकुळ भोई,तालुका कार्याध्यक्ष संदिप लाड,सहसचिव विजय भालेराव,प्रसिद्धी प्रमुख विशाल राठोड, कोषाध्यक्ष सुधीर सैतवाल,प्रदीप पाटील, बबलू तडवी तसेच रावेर तालुका माध्यमिक शिक्षकसेना सदस्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध