Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ जुलै, २०२१

लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई. भूम येथील उपविभागीय अधिकारी तब्बल लाख रु लाच प्रकरणी गळाला ....

भुम(राहूल शिंदे)दि.28 येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांच्यावर मंगळवारी उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वृत्त असे की,

तक्रारदार- पुरुष, वय-29 वर्ष,यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी लोकसेवक:- 1)श्रीमती मनिषा अरुण राशिनकर,वय 45वर्षे,उप विभागिय अधिकारी,उप विभाग भुम, जि.उस्मानाबाद
वर्ग 1
2) विलास नरसींग जानकर,वय 32वर्षे, कोतवाल, देवळाली सज्जा प्रतीनियुक्ति उप विभागिय अधिकारी कार्यालय भुम
वर्ग 4

लाचेची मागणी -- रुपये 1,10,000/- व तडजोडी अंती रुपये 90000 /- व रुपये 20,000/- आरोपी क्र.2 चे हस्ते स्विकारले
लाच रक्कम स्वीकारली- 20,000/- रुपये

तक्रारदार यांचा एक टीप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जे.सी.बी.व तीन ट्राक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी आरोपी क्र.1 व 2 यांनी तक्रारदार याच्याकडे प्रती महिना 1,10,000/- रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती 90,000/- लाच मागुन त्यापैकी 20,000/- रुपये लाच आरोपी क्र.2 हस्ते स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध पो.स्टे.भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत चालू होती.

सापळा अधिकारी - प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक ,ला.प्र.वि. उस्मानाबाद
मार्गदर्शक - मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद
सापळा पथक - पो.नि.गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके.
यांनी ही कारवाई केली आहे.

लाचे संबंधी तक्रार देण्यासाठी:-
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद (मो.क्रं.9527943100) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो.क्र.8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो.क्र. 8652433397) टोल फ्री क्र:-1064
यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध