Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील 85 गावांचा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून समावेश करण्यात यावा,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
शिंदखेडा तालुक्यातील 85 गावांचा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून समावेश करण्यात यावा,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
शिंदखेडा प्रतिनिधी:शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे व 85 गावांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी संदीप दादा बेडसे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री, तसेच संजय बनसोडे राज्यमंत्री,पाणीपुरवठा व स्वच्छता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिंदखेडा तालुक्यातील यासह अशी गाव पाणीपुरवठा योजनेबाबत व सदरील गावांमधील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे करिता जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना राबविणे बाबत विस्तृतपणे चर्चा केली.
शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून बऱ्याच गावांना पाणीपुरवठ्याची निश्चित व कायम स्वरूपी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. बऱ्याच गावांना टँकरद्वारे बारमाही पाणी पुरवठा करावा लागतो. दुथडी भरुन वाहणारी तापी नदी जरी शिंदखेडा तालुक्यातून जात असली तरी वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्ष अभावी तालुक्यातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत.तापी नदीवरील सारंखेडा व सुलवाडे बेरीज मधून शाष्वत पिण्याचा पाणीपुरवठा चिमठाणे,अजंदे (खु) ,अलाने, अमराळे,अंजनविहीरे,अरावे,बाभुळदे, भडणे,चांदगड ,चौगाव (बु),चौगाव
(खु),दलवाडे(प्रस),पिंपरी,चिमठावळ,चिरणेडाबली,दलवाडे (प्रन),डांगुर्णे,सोंडले,
दराणे, दरखेडा,दसवेल,दत्ताणे, देगाव देवी,धांदरणे,धावडे,गव्हाणे,शिराळे,गोराणे, हतनुर, होळ(प्रबे),जखाणे,जातोडे, जोगशेलु,कदाणे,कलमाडी,कामपुर,वरूळ, वरझडी,विखरण,विखुर्ले, विटाई,कंचनपुर,
कर्ले, देवकानगर,खलाणे,खर्दे(बु), महालपुर,माळीच,मालपुर,मांडळ,मेलाणे, मेथी, मुक्टी,निरगुडी,निशाणे,कुमरेज, परसामळ,परसोळे,पथारे,पिंपरखेडा, पिंप्राड,रहिमपुरे,रामी,रेवाडी,रोहाणे,साळवे,
सार्वे,सतारे,शेवाडे,सोनशेलु,अक्कलकोस,चुडाणे, कलवाडे, सुराय, तामथरे, टेंभलाय, वाघोदे,वायपुर,घुसरे,वाघाडी(बु),बाभळे,वाघाडी (खु),हिरवे,वाडी अशा एकूण गावांना जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून कायम स्वरूपी लाभ मिळेल व या योजनेस साधारण २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.असे संदीप दादा बेडसे यांनी निदर्शनास आणून दिले.
सदरील सर्व परिस्थितीचा विचार करता शिंदखेडा तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय जी बनसोडे यांनी सदरील योजना कार्यान्वित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासित केले तशा स्पष्ट सूचना माननीय प्रधान सचिव,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांना दिल्यात.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा