Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
भोईराज पतसंस्थेत अपहार प्रकरणी मुख्य आरोपी सुनील वाडीले याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी
भोईराज पतसंस्थेत अपहार प्रकरणी मुख्य आरोपी सुनील वाडीले याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी
शिंदखेडा प्रतिनिधी: शिंदखेडा येथील भोईराज ग्रामीण पतसंस्थेच्या सुमारे 63 लाख रु अपहार प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपी व्यवस्थापक सुनील पुना वाडीले याला आर्थिक गुन्हे शाखा यांनी सापळा रचून शिंदखेडा येथे अटक केली. दि 18 रोजी शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती.
शनिवार दि.२१ रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर,पो कॉ मुन्ना शेख,रविंद्र शिंपी यांनी न्यायालयात हजर केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा