Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

शिरपूर तालुक्यात खर्दे उंटावद रोड वर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी एका इसमाकडून 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम लंपास..!



शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यात खर्दे उंटावद रोड वर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी एका इसमाकडून 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम लंपास करून पोबारा केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आमोदा येथील रहिवासी जयपाल अशोक गिरासे हे एका खाजगी कंपनीचे कर्मचारी असून ते दररोज रोख रक्कम कलेक्शन करून बँकेत भरणा करत असतात.

आज दिनांक 23 रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी आपले कलेक्शन ची रक्कम जमा करून खर्दे कडे जाऊन दुसऱ्या ग्राहकाकडे रक्कम कलेक्शन साठी जात असताना खर्दे उंटावद रोडवर त्याच्या मोटर सायकल ला तीन अज्ञात इसमांनी त्याला अडवले व त्याला शेजारील उसाच्या शेतात नेऊन चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्यांच्याकडे युनिकॉन कंपनीचे मोटरसायकल होती तिघांनी आपले तोंड कापडाने बांधले होते अशी प्राथमिक माहिती तक्रारदार जयपाल गिरासे यांनी पोलिसांना दिली आहे.

सदर घटनेबाबत तात्काळ कंपनीला देखील सुचित करण्यात आले असून घटनेची माहिती तात्काळ शिरपूर शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनास्थळावर जाऊन पोलीस तपास सुरू केला यावेळी एल सी बी विभाग ,फॉरेन्सिक विभाग, डॉग्स कॉड यांनादेखील पाचारण करण्यात आले होते.  त्यानंतर पोलिसांना सदर घटनेतील चोरीची बॅग व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल बेवारस पडलेले आढळून आली. 

यावरून शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही मात्र पोलीस चोरांच्या मागावर असून याबाबत सखोल तपास करून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे .मात्र सदरच्या घटनेने पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे केले असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना चा छडा लावत चोरट्यांना जेरबंद करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावी अशी जन माणसांची भावना आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध