Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

होळनांथे येथे बस बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या गॅस एजन्सीच्या गाडीतून अज्ञात चोरट्यांनी 36 हजारांची रोकड लंपास



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील होळनांथे येथे बस बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या गॅस एजन्सीच्या गाडीतून अज्ञात चोरट्यांनी 36 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी थाळनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तालुक्यातील होळनांथे येथे बस बसस्थानकाजवळ शनिवार, 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिरपूर येथील द्वारकाई गॅस एजन्सीचे गॅस सिलेंडर वितरण करणारे वाहन (क्रमांक एमएच-18 एम. 1238) हे वाहन चालकाने उभे करून चालक व कर्मचारी नाश्ता करण्यासाठी गेले असता वाहनाच्या कॅबीनमध्ये 36 हजार रुपये रोख असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. नाश्ता झाल्यावर ड्रायव्हर व कर्मचारी यांना घटना समजल्यावर त्यांनी थाळनेर पोलिसांना माहिती दिली.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध
घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक उमेश बोरसे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. बस स्टॅन्डवर भरदिवसा चोरी झाल्याने परीसरातील व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध