Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

शिरपूर शहरातील भिका पवार यांच्या प्रामाणिकपणाचे शिरपूरकरानकडून कौतुक



शिरपूर शहरात तसेच तालुक्यात अनेक व्यक्ती प्रामाणिकपणामुळे नागरिकांच्या चर्चेत असतात. अशी चर्चा दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री करवंद नाका परिसरात सुरू होती. शिरपूर शहरातील आनंद पार्क सेक्टर क्रमांक चार मधील रहिवासी व आर. सी. पटेल येथे ग्राउंड मेंटेनन्स विभागात कार्यरत भिका पवार यांना दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री आर. सी. पटेल सीनियर कॉलेज समोर एक मोबाईल रस्त्याच्या पलीकडे पडलेला आढळला. 

त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचे सन्मित्र शिक्षक अमोल सोनवणे यांना संपर्क साधला. आणि सदर मोबाईल धारक आपल्याकडे मोबाईल घेण्यासाठी येईल तुम्ही घराकडे निघून या असे भिका पवार यांना सांगितले. काही वेळानंतर करवंद नाका येथे राजपाल कॉम्प्लेक्समध्ये बूट हाऊस शॉप चे मालक विनोद बलराजा यांनी हरवलेला मोबाईल वर  कॉल केला व माझा मोबाईल हरवला आहे असे सांगितले. लागलीच भिका पवार यांनी त्यांना त्यांच्या घराकडे बोलवले व सदर मोबाईल कोणताही विलंब न करता सुखरूपपणे परत केला. 

हरवलेला मोबाईल परत भेटल्यावर त्या व्यक्तीला अत्यानंद झाला.यासंदर्भात दुकानदाराने काहीतरी बक्षीस म्हणून रक्कम देण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता बूट शॉप च्या मालकाला मोबाईल परत करण्यात आला. अशा प्रामाणिक व्यक्तीच्या प्रामाणिकपणाची चर्चा दिवसभर करवंद नाका परिसरात तसेच शहरात सुरू होती. अशा प्रामाणिक व्यक्तीच्या कार्याला सलाम....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध