Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

वृद्ध शेतकर्‍यास बेदम मारहाण बँकेच्या चेअरमन सह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल



शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जयराज जैन त्यांचा भाऊ हर्षल जयराज जैन व इतर तीन जणांनी ६८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी वृद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर खुर्द शिवारात शहादा येथील नारायण नथ्थु सोनार वय ६८यांची शेती आहे.या शेतीत सध्या सुरभाभुळाची लागवड केलेली आहे. नारायण सोनार हे आपल्या शेतात मोबाईल अँप ने पीक पाहणी लावण्यासाठी गेले होते.त्यांच्या बांधलाच प्रसन्न जयराज जैन व हर्षल जयराज जैन यांची शेती आहे. नारायण सोनार हे पीक पाहणी लावत असताना जैन बंधू व इतर तीन जण तेथे आले.त्यांनी सदर शेतकऱ्याला या क्षेत्रात पाय का ठेवले म्हणून जाब विचारला. तसेच तू सौदा पावती केलेली आहे. त्यामुळे या शेतात पाय कसा ठेवला असा जाब विचारला. यावर वृद्ध शेतकऱ्याने आतापर्यंत या शेतात मीच पीक घेत आहे.तसेच सुभाभुळ लावला तेव्हा तुम्ही काही बोलले नाही.

आता मी पिक पाहणी लावण्यासाठी आलो तर का म्हणून बोलतात.याचा राग आल्याने जैन बंधू व त्यांच्यासोबत असलेल्या इतर तिघांनी वृद्ध शेतकरी नारायण नथ्थु सोनार यांना बेदम मारहाण केली आहे.सदर शेतकऱ्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी नारायण नथ्थु सोनार राहणार शहादा यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रसन्न जयराज जैन,हर्षल जयराज जैन,पिंटू व इतर चार जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध