Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

वरुळ-घुसरे ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवक महेंद्र पाटीलची हातचलाखी ग्रामपंचायत अपहार प्रकरण आता जिल्हाभरात चर्चेत; प्रशासनात खळबळ




शिंदखेडा (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील वरुळ-घुसरे ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संगनमताने अतिशय बनावट व बोगस यादी तयार करून प्रधानमंत्री आवास योजना मनसोक्तपणे लाटली व लुटली आहे. सरळ-सरळ उघड होत आहे.

याषाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील वरुळ-घुसरे ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकूण १९४ ग्रामस्थांची यादी मंजुर करण्यात आली. ही यादी सन २०२०-२१ साठीची असताना यात ग्रामपंचायत लोकप्रतीनिधी व ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या निकटवर्तीय व हस्तक यांच्या नावे लाभ घेण्यासाठी बनावट नावाने व्यक्ती व लाभार्थी यादीत नावे समाविष्ट करून प्रधानमंत्री आवास योजना मनसोक्तपणे लाटता यावी व सढळ हाताने लुटता यावी यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व लोकप्रतीनिधी यांनी संगनमताने यादी कालावधीपेक्षा ५-७ वर्षापुर्वी मयत व्यक्तीची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली.
इतकेच नव्हेतर आपल्या उदरनिर्वाहासाठी २०-२५ वर्षापुर्वी गाव सोडून दुसरीकडे बाहेरगावी गेलेले व ते तेथेच स्थायीक झालेल्या व्यक्तीची नावे देखील या यादीत समाविष्ट केलेली आहेत.

सन २०१९ च्या ग्रामसभेत अपात्र व्यक्तीची यादी ग्रामसभेच्या ठरावानिशी गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे. मात्र सदर यादी वाचन केल्यानंतर संबंधित अधिकान्यांनी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संगनमताने बदलविली की काय? अशी शंका निर्माण झालेली आहे.
लोकप्रतिनिधी यांनी अतिशय बनावटी व्यक्ती, बनावट घरकुल, बनावट जागा दाखवून तसेच ग्रामसेवक यांनी देखिल खोटे नमुना नं. ८ सादर करुन शासन निधीचा मनसोक्त लयलुट केलेली प्रथम दर्शनी दिसून येते. तर या सर्व यादीत अपात्र व्यक्तीची सभासद यादी प्राप्त झालेली असताना देखिल त्यास मंजुरी देताना कोणतीही खात्री न करता, प्रत्यक्ष पहाणी व वास्तविकता न तपासता त्यास मंजुरी देणारे वरिष्ठ अधिकारी हे देखील वादाच्या भक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

या सर्व प्रकरणाबाबत गावातील काही ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकायांकडे वेळोवेळी तक्रार करून देखील कोणतीही दखल न घेता झालेला अपहार हा लपविण्याचाच प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि म्हणून तक्रारदाराने मा. मुख्यमंत्री यांच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार केल्याचे वृत्त आमच्या प्र तिनिधीस प्राप्त झालेले आहे. 

त्यातच गावातील काही तक्रारदारास लोकप्रतिनिधींनी रस्त्यात अडवून धमकी दिल्याचे वृत्त व त्यासंबंधीत दाखल गुन्ह्याची एन.सी.आर. प्रत आम्हांस प्राप्त झालेली आहे. आता पोलीस प्रशासन,ग्रामविस्तार अधिकारी, जिल्हाधिकारी हे नेमके काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. (सविस्तर वाचा पुढील अंकात...)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध