Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील चांदपूरी येथील दुकानदारावर गुन्हा दाखल..! रेशन मालाचे वाटप न करता थेट बाजारात केली विक्री
शिरपूर तालुक्यातील चांदपूरी येथील दुकानदारावर गुन्हा दाखल..! रेशन मालाचे वाटप न करता थेट बाजारात केली विक्री
शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील रेशन दुकानदारांवर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाने गुन्हा दाखल केल्याने रेशन दुकानदार आणि मध्ये खळबळ माजली आहे. काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुक्यातील चांदपूरी येथील दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रेशन मालाचे धान्य काळ्याबाजारात जाऊन विक्री करण्याच्या आरोपावरून तालुक्यातील चांदपूरी येथील दुकानदार मन्सूर आरिफ मेमन दुकान क्रमांक 50 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर दुकानदाराने धान्याची काळ्याबाजारात विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार आबा महाजन पुरवठा, अधिकारी मायानंद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पुरवठा अधिकारी अपर्णा वडुडकर ,पुरवठा निरीक्षक अधिकारी पी बी सोमलकर ,मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शहानिशा केली असता दुकानातून 95 हजार 350 रुपये किमतीचे 37 क्विंटल गहू ,80 हजार 460 रुपये किमतीच्या 26.82 क्विंटल तांदूळ, 989 रुपये किमतीचे 66 किलो साखर असा एकूण 1 लाख 37 हजार 790 रुपये किमतीच्या 55 क्विंटल 16 किलो रेशन धान्य माल लाभार्थ्यांना वाटप न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्याबाजारात विक्री केल्याचे आढळून आले.
त्यामुळे तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने कठोर कारवाईचा निर्णय घेत अधिकाऱ्यांना कायदेशीर गुन्हा दाखल करणे बाबत कारवाई करण्याचे सांगितल्यानंतर पुरवठा अधिकारी यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख करत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा