Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
दोंडाईचा पालिकेत गेल्या वेळीं प्रमाणे द्विसदस्यीय पद्धत...! वॉर्ड पद्धतीची आशा असणाऱ्यांचा हिरमोड...!
दोंडाईचा पालिकेत गेल्या वेळीं प्रमाणे द्विसदस्यीय पद्धत...! वॉर्ड पद्धतीची आशा असणाऱ्यांचा हिरमोड...!
महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपची बहू सदस्यीय पद्धत बदलून वॉर्ड पध्दतीने निवडणूक होईल अशी शक्यता होती पण मुंबई वगळता सर्वच ठिकाणी बहू सदस्यीय पद्धत जैसे थे ठेवल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे,यात दोंडाईचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर ही पध्दत रावल गटासाठी नेहमीच अधिक फायदेशीर ठरली आहे,कारण रावल गटाची संपूर्ण दोंडाईचा शहरात मते आहेत वॉर्ड पद्धतीने ती विभागली जातात पण द्विसदस्यीय पद्धतीने ही मते निर्णायक ठरतात म्हणून जे हौसे- -गवसे-नवसे होते त्यांचा हिरमोड झाला असल्याची चर्चा दोंडाईचा शहरात आहे..
सन 2001 आणि 2016 मध्ये बहू सदस्यीय पद्धत होती त्यात रावल गटाने एकतर्फी बाजी मारली होती आता ही सण 2016 चीच पद्धत राज्य शासनाने अवलंबली असल्याने या निवडणुकीतही देखील रावल गटाला लाभदायक ठरेल असा जाणकारांचा अंदाज आहे, याशिवाय शहरात 55 कॉलनी मध्ये झालेल्या जॉगिंग ट्रॅक,मुलांना खेळण्यासाठी बगीचा,ओपन जिम,भव्य दिव्य प्रशासकीय इमारत, राजपथ,नवीन पाणीपुरवठा योजना, अमरावती आणि भोगावती नदीचे झालेले सुशोभीकरण,अब्दुल कलाम सेतू मुळे दलित वस्ती सह गौसिया नगर चा भाग जोडणे, शहरात विविध भागात झालेले रस्ते 11 घंटागाड्या मार्फत दररोज होणारी साफसफाई आदी अनेक चांगल्या सुविधा 5 वर्षाच्या काळात आमदार जयकुमारभाऊ रावल यांनी शहरात केल्या आहेत.या 5 वर्षात शहरात मोठ्या प्रमाणावर विकास झाला ही बाब विरोधक देखील मान्य करीत असल्याने ही रावल गटासाठी जमेची बाजू आहे.
एकूणच वॉर्ड पध्दतीने निवडणूक होईल ही आशा बाळगणाऱ्यांचा हिरमोड झाला असून दुसरीकडे रावल गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा