Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ सप्टेंबर, २०२१
वडापाव व भाजी विक्रेतेच्या लेकीने आपल्या पालकाचे सामाजिक पटलावर केले नांव
कोपरगांव प्रतिनिधी:- कुमारी भाग्यश्री ज्ञानेश्वर वाडीले यांची बँक आँफ अमेरिका, शाखा वाॅशिंग्टन या ठिकाणी टेक असिस्टंट या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल परिसरातून तसेच सामाजिकपातळीवरून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.
कुमारी भाग्यश्री यांचे वडील कोपरगांव शहरात एका ठिकाणी वडा पावची गाडी लावत आहेत तर आई डोक्यावर भाजीपाल्याची टोपली घेऊन भाजीपाला विकण्याचा व्यापार करत आहे. मोठ्या कष्टातून पालकांनी आपल्या मुलीचे शिक्षण केल्याचे समजते. अस म्हणतात की, सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळाच बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची, मनमिळावू स्वभावाची आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटलीच पाहिजेत असचं काही तरी कुमारी भाग्यश्री हिच्या बाबतीत घडले आहे.
आईवडिलांच्या कष्टाचे मात्र कुमारी भाग्यश्री हीने सार्थक केले आहे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की, आयुष्य जगण्यात एक वेगळाच रूबाब येतो आणि "रुबाब" हा विकत घेता येत नाही, अन् दाखवता पण येत नाही पण तो व्यक्तिमत्त्वातून सिद्ध होतो तसचं कुमारी भाग्यश्री हीने आपले एक व्यक्तीमत्व निर्माण केले आहे. कुमारी भाग्यश्री हीस तरुण-गर्जना या परिवाराकडून भावी आयुष्यातील कार्यास आम्ही शुभेच्छा पाठवत आहोत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा