Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त दोंडाईचा येथे रक्तदान शिबिर



दोंडाईचा प्रतिनिधी:विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त दोंडाईचा विभागातील वीज कर्मचारी/अधिकारी, सभासद व मित्रपरिवार यांनी दिनांक ०४/०९/२०२१वार.शनिवार रोजी रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी कार्यक्रमाचे मा. डॉ भाऊसो तुषारजी रंधे (जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे) यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना युनियन कडून आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कोविड काळात रक्ताची भासत असलेली निकड पाहता विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत सामाजिक जाणिवेतून घेतलेले रक्तदान शिबिर हे नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.कोरोना काळात सर्व काही बंद असताना ऊर्जा विभागाचे सर्व कर्मचारी २४ तास जनतेच्या सेवेत अविरतपणे हजर होते. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदानासारख्या महान कार्यात सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे. 

युनियनने शिबिरातून संकलन केलेलं रक्त अनेक गरजूंना उपयुक्त ठरणार असून यातून नवीन संजीवनी मिळेल .
तसेच सामाजिक बांधिलकी जपत युनियनच्या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त दोंडाईचा विभागातील पदाधिकारी व सभासद वर्ग यांनी दिनांक.०३/०९/२०२१ वार शुक्रवार रोजी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ऍडमिट रूग्णांना सफरचंद व बिस्किट वाटप करून सामाजिक कार्य केले. युनियन मार्फत नेहमी सामाजिक कार्य होत असते. मागील वर्षीही रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तसेच कोविड१९ सारख्या संसर्गजन्य आजारात २४ तास उत्कृष्ट सेवा दिलेले सभासद बंधूंना युनियन कळुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते *कोरोना युद्धो* म्हणून गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. भविष्याती वेळोवेळी अशीच समाज कार्य करून समाजाप्रती दायित्वाची भूमिका बजावत राहतील.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी श्री.मज्जीत खाटीक,महेश सोनार, नरेंद्र सुरेशसिंग गिरासे, निलेश माळी, ज्ञानेश्वर गिरासे, दिलीप बिरारी.मिलिंद कढरे
यांचे विशेष योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध