Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
पत्रकारितेला कलंक लावणाऱ्या भामट्या विजय टाटियासह तिघांवर गुन्हा दाखल लवकरच मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत?
पत्रकारितेला कलंक लावणाऱ्या भामट्या विजय टाटियासह तिघांवर गुन्हा दाखल लवकरच मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत?
डोंबिवली (सुशील बाफणा) अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून लोकहित साधणाऱ्या पत्रकारांची मोठी संख्या आपल्या राज्यात आहे. या पत्रकारांच्या वृत्तसंकलनामुळे स्थानिक पातळीपासून विधान सभेपर्यंत अनेक बदल प्रशासनाला करावे लागले आहेत. मात्र स्वत:ला पत्रकार म्हणून समाजात वावरणारे काही महाभाग पत्रकारितेला बदनाम करत आहेत. अशाच प्रकारे पत्रकारितेवर कलंक असलेल्या विजय टाटियासह त्याच्या दोन साथीरांवर डोंबिवलीतील मानमाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय टाटिया या भामट्याने सतर्क पोलीस टाईम्सचे मालक / मुख्य संपादक शमशुद्दीन शेख यांचे चेक लांबवले. सदर चेक बाऊं स करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न विजय टाटिया याने केला होता. या प्रकरणातच सदर गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे अनेकांना राज्यभर फूस लावल्याने त्याच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल असून लवकरच मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस सूत्रांनी दिले आहेत.
सतर्क पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रुम नं. ४०५, चौथा मजला, बामनदेव आर्केड, मानपाडा रोड, विको नाका, डोंबिवली (पूर्व)४२१२०३ या पत्त्यावर शमशुद्दीन शेख यांचे ‘सतर्क पोलीस टाईम्स’ वृत्रपत्राचे कार्यालय आहे. ९ जानेवारी २०१९ रोजी या कार्यालयातून एक लॅपटॉप (किंमत २५ हजार रुपये), चार कॉम्प्यूटर (एक लाख रुपये) व डीव्हीआर मशीन, चेक बूक चोरीला गेले. त्यावेळी शेख यांना समीर मोरे याने कार्यालयात डल्ला मारल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार ते १० जानेवारी २०१९ रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता तेथे कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदाराने लेखी तक्रार करण्यास सांगितली. त्यानुसार शमशुद्दीन शेख यांनी ‘सतर्क पोलीस टाईम्स’ च्या लेटर हेडवर लेखी तक्रार केली. त्या तक्रार अर्जाची दखल घेऊ न पोलिसांनी समीर मोरे याची चौकशी केली. मात्र चौकशीअंती त्याने चोरी केली नसल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यानच्या काळात मे २०१९ महिन्यात शमशुद्दीन शेख यांच्या राहत्या घरी ९ लाख रुपयांचे चेक बाउन्स केल्याबाबत ‘मयूर विजय टाटिया’ व ‘कोमल सिंग गिरासे उर्फ परमार’ (रा. शिंदखेडा, धुळे) यांनी नोटीस पाठवली. स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेचे चेक बाउन्स झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र या दोन्ही व्यक्तींना शेख ओळखत नाहीत. असे असताना या दोघांनी चेक बाऊन्स केल्याबाबत न्यायालयात कलम १३८ नुसार दावा दाखल केला होता. जे चेक बूक चोरीला गेले होते. त्यापैकीच दोन चेक बाउंस करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणाचा शेख यांनी शांतपणे विचार केल्यास त्यांना विजय टाटियावर दाट संशय आला. त्याकाळी नाशिकहून मुंबईला आल्यास विजय टाटिया हे ‘सतर्क पोलीस टाईम्स’च्या कार्यालयात मुक्कासाठी राहत. हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे खर्च होतात. त्यामुळे कार्यालयाची चावी देण्यासाठी विजय टाटिया याने शमशुद्दीन शेख यांच्याकडे विनंती केली. त्याची अडचण लक्षात घेऊन माणुकीच्या दृष्टीकोनातून शेख यांनी त्याला विश्वासाने कार्यालयाची एक चावी दिली. मात्र विजय टाटिया याने शेख यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत कार्यालयातील ४ कॉम्पुटर, एक लॅपटॉप व त्यांच्या नावाचे स्टेट बँक इंडिया (वरळी दक्षिण शाखा) बँकेचे चेक बूक चोरले व त्या चेकद्वारे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर शमशुद्दीन शेख यांनी विजय टाटिया याच्या विरुद्ध तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, या प्रकरणी गुरुवार २ सप्टेंबर २०२१ रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ०४६५/२०२१) भादंवि कलम ३८० नुसार विजय टाटिया, मयूर विजय टाटिया, कोमल सिंग दौलतसिंग परमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परिमंडळ ३ चे उपायुक्त विवेक पानसरे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे करत आहेत.
असा रचला पैसे उकळण्याचा डाव
कार्यालयातून चोरी करून त्याचा गैर वापर करण्यासाठी विजय टाटिया याने त्याचा मुलगा मयूर टाटिया (मोबाईल नंबर ९४०४०२८३२२),कोमल सिंग दौलतसिंग परमार (मोबाईल नंबर ९९२३५३२२२४) यांनी शेख यांच्यासोबत कोणताही व्यावहारिक संबंध नाही. या दोघांना ते ओळखत सुद्धा नाही. तसेच यापूर्वी त्यांनी कुठल्याच प्रकारे त्यांच्याशी व्यवहार केलेला नाही. असे अतानाही विजय टाटिया यांच्या सांगण्यावरून त्यांनी शमशुद्दीन शेख यांच्या कार्यालयातून (भारतीय दंड संहिता ३८०) चेक चोरून (भारतीय दंड संहिता ४१५, ४१८, ४१९, ४२०) शमशुद्दीन शेख यांची फसवणूक केली.(भारतीय दंड संहिता ४०३ ) व (भारतीय दंड संहिता ४०६, ४०७) त्यांच्या विश्वास घात केला आहे.(भारतीय दंड संहिता ४१३, ४१४ ) विजय टाटिया, मयूर टाटिया, कोमल सिंग गिरासे यांना लोकांना फूस लावून त्यांच्या वस्तूंचा लबाडीने गैरवापर करण्याची सवय आहे. त्याबाबत त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पत्रकारितेच्या नावावर इतर जिल्ह्यातील लोकांशी जवळीक निर्माण करून त्याच्या घरात किंवा कार्यालयात घुसून विश्वास घात करुन चोरी करून हाती आलेल्या चेकचा गैरवापर करण्यात विजय टाटिया, मयूर टाटिया, कोमल सिंग दौलतसिंग परमार हे शातीर आहेत. त्यांच्याकडे खोटे स्वाक्षरी करणारा माणूस आहे.
तो माणून कोणाच्याही नावाचे पेन कार्ड पाहून किंवा लेटरवर कोणत्याही कारणाने स्वाक्षरी करून स्वत:कडे त्याची एक प्रत माहितीसाठी ठेवतो. नंतर त्याच्या हाती चेक बुक लागले तर त्याच्या स्वाक्षरी करून इतर जिल्ह्यात चेक बाऊन्स केल्याचा दावा दाखल करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचण्यात हा खिलाडी आहे. असे अनेक प्रकार त्यांनी इतर जिल्ह्यातही केल्याचे आपल्या तपासता उघड होईल. विजय टाटिया हा काही वकिलांना हाताशी घेवून अनेक लोकांना १३८ च्या नावाखाली न्यायालयाची शिंदखेडा न्यायालय नोटीस काढून लूटत आहेत.
काही निवडक गद्दार पोलिसांचे विजय टाटियाला पाठबळ विजय टाटिया हा मूळचा धुळे जिल्ह्यातील खलाने गावचा रहिवासी आहे. विजय टाटिया याची कोमलसिंग दौतलतसिंग परमार याच्यासह इतर साथिदारांची टोळी असून ते सर्वसामन्यांना आपल्या जाळ्यात अडकवून गुन्हेगारी कृत्य करत आहेत.अशा प्रकारे त्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. सन १९९६ सालापासून धुळे, शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबार, थाळनेर, दोंडाई आदी ठिकाणांसह उत्तर महाराष्ट्रात कूकर्म केल्याने त्यांच्याविरुद्ध ६० ते ७० गुन्हे दाखल आहेत.तसेच राज्यभर अन्य ठिकाणी ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.तसेच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी धुळे पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८,३६३, ३६५, ३६६ ए, ३७० अ, ३७२, ३७३, ३७६, १२० ब, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर विजय टाटिया याने त्या पीडित मुलीला वेश्याव्यवसायत ढकलल्याचे बोलले जात आहे.
समाजासाठी घातक असलेल्या विजय टाटिया व त्याच्या साथीदारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत.मात्र काही निवडक गद्दार पोलीस विजय टाटिया याचे पाठबळ वाढवत आहेत. पैशांच्या हव्यासापोटी विजय टाटियावर अनेकदा कारवाई टाळली गेली आहे. मात्र आता विजय टाटिया याच्या गुन्ह्याचा घडा भरला असून त्याच्यावर लवकरच मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत कर्तव्य दक्ष पोलिसांनी दिले आहेत. ही कारवाई झाल्यास फसवणूक झालेल्या अनेकांना न्याय मिळेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा