Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
महापुरुष चा पुतळा स्थापने वरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या विध्वंसक प्रवृत्तीचा जाहीर निषेध
महापुरुष चा पुतळा स्थापने वरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या विध्वंसक प्रवृत्तीचा जाहीर निषेध
धुळे,दोंडाईचा शहरात 2011 पासून दोंडाईचा शहरात प्रलंबित राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा अखेर दहा वर्षानंतर पूर्ण करू पहात आहे ही आनंदाची गोष्ट आहे .परंतु विध्वंशक प्रवृती् च्या विचारातून विध्वंसक विचारच येत असतात .त्याचाच एक भाग म्हणजे नंदुरबार चौफुलीवर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच राऊळ नगर मधील चौफुलीवर वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा याचे नियोजन प्रथमता ठरले होते.
परंतु दृष्ट प्रवृती्च्या लोकांच्या डोक्यात विचार आला की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्ग ,चौक त्या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा उभा करायचा, महाराणा प्रतापांचा पुतळ्याला कोणाचाही विरोध नाही,विरोध राहणारही नाही परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाला पुसून ,नष्ट करून दुसरी वास्तू उभी करणे यास 100% विरोध असेल व राहील. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,विर शिरोमनी महाराणा प्रताप,राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला प्रेरित दलित व मातंग समाजाने संघटित होऊन विरोध केला की वीर शिरोमणी महाराणा प्रताप आमच्यासाठी आदर्श आहेत व राहतील तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे देखील आमचे आदर्श आहेत त्यांचे नाव मिटवून त्या ठिकाणी त्या चौकाचे नाव नेस्तनाबूत करून महाराणा प्रताप यांचे नाव न लावता राऊळ नगर मध्ये ठरलेल्या नियोजना नुसार लावावे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. विध्वंस प्रवृत्तीचे आमदार जयकुमार रावल यांनी अशा पद्धतीने चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.
परंतु वैचारिक लोक एकत्रित येऊन त्यांनी पूर्विपासूनचे चौकाचे नाव लोक शाहीर अण्णाभाऊ साठे चौकाचे नाव तसेच राहू द्यावे व राऊळ नगर मध्ये विर शिरोमनी महाराणा प्रताप यांचा पुतळा चे भव्य दिव्य चौक सुशोभिकरण करावे.आम्ही तन-मन-धनाने त्यात सहभागी राहू.परंतु विध्वंसक प्रवृत्तीच्या विचाराच्या लोकांनी गैर कृत्य करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रकार सुरू केला आहे.
या प्रकरणाशी शाम सनेर यांच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या सहभाग नव्हता .तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित तसेच मातंग वाड्यांमधील राहणाऱ्या समस्त नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होता. तरी अशा चांगल्या कामांना गालबोट लावण्याचा प्रयत्न सडक्या डोक्यातून, सडक्या विचारातून, सडक्या व्यक्तींकडून झाला तो संपूर्ण निषेधार्थ आहे
आमच्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,वीर शिरोमणी महाराणा प्रताप, राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. त्यांचे विचार ,आचार हे आमच्या कृतीतून नेहमीच दिसून येतील. तरी अशा पद्धतीने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पापी विचारांचा, पापी व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा