Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

खर्दे ता.शिरपूर येथील आर.सी.पटेल माध्य. व उच्च माध्य.विद्यालयात शिक्षक दिन साजरा


तालुक्यातील खर्दे येथील आर.सी.पटेल  माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात शिक्षक दिन सरपंच सविताबेन काशिनाथ पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन उपस्थित सर्व मान्यवर व शिक्षकांनी केले.

शिक्षक दिना निमित्त  विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका समजावी यासाठी शालेय अध्यापनाचे कामकाज विद्यार्थी शिक्षक यांनी पार पाडले. आदर्श अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांचा गौरव  सविताबेन पटेल व उर्मिलाबेन चौधरी यांनी केला.
 
कोरोना महामारी च्या काळात  शाळा बंद असल्या तरीही  विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये यासाठी शिक्षक ऑनलाइन अथवा ऑफलाईन पद्धतीने अध्यापन करून महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत .म्हणून Thanks A Teacher या भावनेने विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे  यांचा सत्कार शाल,श्रीफळ व बुके देऊन सरपंच काशिनाथ  पटेल,उपसरपंच नितीन गुजर,माजी सरपंच भरत गुजर व पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी केला.तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचा स्नेहवस्त्र , श्रीफळ व बुके देऊन सन्मान  यावेळी करण्यात आला.

विद्यार्थी प्राचार्य हेमांगी गुजर हिने एक दिवसीय विद्यार्थी प्राचार्या ची भूमिका पार पाडून शालेय अध्यापनाचे कामकाज सुव्यवस्थितपणे सांभाळले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे,ए जे पाटील, हेमांगी गुजर,स्मिता गुजर यांनी  "शिक्षकाचे समाजातील महत्वपूर्ण स्थान" याविषयावर आपले विचार मांडलेत. 
  
याप्रसंगी सरपंच सविताबेन पटेल,उपसरपंच नितीन गुजर,माजी उपसरपंच भरत गुजर,पोलीस पाटील सुरेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या सौ.उर्मिलाबेन चौधरी विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे, पी बी धायबर,ए जे पाटील, पी एस अटकळे, बी एस बडगुजर, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी एम पवार,बी एस पावरा,  मनीषा पाटील, सुनंदा निकम, सुनीता सुर्यवंशी, सीमा जाधव ,युवराज मिठभाकरे,राकेश पाटील,साहेबराव कोळी, तारासिंग गिरासे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुजर,व आभार प्रदर्शन अमोल सोनवणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध