Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
बारामतीत सहाय्यक पोलीस निरीक्षक 30,000 लाच घेताना पकडले लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
बारामतीत सहाय्यक पोलीस निरीक्षक 30,000 लाच घेताना पकडले लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
सावकारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात मदतीसाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना बारामती शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार संदिपान माळी याला अटक करण्यात आली आहे. ४० हजारांपैकी ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, या घटनेमुळे बारामती शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावकारी कायद्यान्वये दाखल केलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठवताना आपल्या बाजूने पाठवण्यासाठी सहकार्य करावे यासाठी तक्रारदाराच्या पत्नीकडे संदिपान माळी याने ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत संबंधित तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. त्यानुसार आज या प्रकरणात तडजोड करून ३० हजार रुपये स्वीकारताना संदिपान माळी याला रंगेहाथ पकडण्यात आले.आमच्याकडे कोणत्याही कामासाठी पैसे घेतले जात नाहीत’
दरम्यान, या घटनेनंतर बारामतीत एकच चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी येथील पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ‘आमच्याकडे कोणत्याही कामासाठी पैसे घेतले जात नाहीत’ अशा आशयाचा फलक लावला होता. त्यातून त्यांनी पारदर्शक कारभार केला जात असल्याचे दर्शवले होते. त्यानंतर काही दिवसांतच हा फलक काढण्यात आला. आज झालेल्या कारवाईमुळे प्रत्यक्षात उलटेच घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर बारामती शहर पोलिस ठाण्यातील विविध प्रकरणांबाबत चर्चाही रंगू लागल्या आहेत. यापूर्वी बारामती शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिसाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित होवू लागली आहे. त्यामुळे आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा