Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १० ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील मिनी सेक्स कॅण्डल मधील स्वतःला उच्चभ्रुत समाज समजणाऱ्या आंबट शौकिनांच्या लवकरच भांडाफोड...
शिरपूर तालुक्यातील मिनी सेक्स कॅण्डल मधील स्वतःला उच्चभ्रुत समाज समजणाऱ्या आंबट शौकिनांच्या लवकरच भांडाफोड...
शिरपूर : (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर बलात्काराच्या घटना समोर येत आहेत.काही दिवसांपूवीच समोर आलेली डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराची घटना तर अत्यंत धक्कादायक म्हणावी अशीच आहे.
डोंबिवलीतल्या एका अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी बलात्कार केला. या सगळ्या प्रकरणात आरोपी आणि या पीडितेची ओळख इंस्टाग्रामवरुन झाली होती. यानंतर अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या पीडितेवर ३३ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेने २७ वर्षांपूर्वी घडलेल्या जळगाव सेक्स स्कँडलची वाईट आठवण पुन्हा एकदा महाराष्ट्राला झाली आहे.
अशीच पुन्हा नविन घटना आपल्याच खान्देशात मात्र अत्यंत स्वच्छ व नितळ प्रतिमा असलेल्या शिरपूर तालुक्यातील उच्चभ्रुत समाजातील अंबट शौकीनांनी डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.अश्या कलंकीत व्यक्तींना फाशी व्यतिरिक्त कोणतीच शिक्षा मिळू नये अशी प्रतिक्रीया महिलांकडून होत आहे. यासाठी खरेतर जळगांव शहरातील सेक्स स्कँडल बाबत विविध महिला संघटनांनी, मंडळांनी ,स्त्री संस्थांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने करुन आरोपींना तुरुंगाच्या पिंज-यात पोलीसांमार्फत कैद केले होते.
यात ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी या प्रकरणी 'नारी समता मंचा' तर्फे अनेकदा जळगावचे दौरे करुन न्याय हक्काचे व पुरुषप्रधान संस्कृती विषयी प्रश्न उपस्थित केले होते. हिच पुनरावृत्ती आपल्या शिरपूर तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिरपूर तालुक्यातील अत्यंत उच्चभ्रु त समाजातील व्यक्तींनी घडवलेल्या या सेक्स स्कॅण्डल बाबत सत्यता लवकरच जनतेसमोर येणार आहे. पिडीत महिलेने या आंबट शौकीनांची नावे त्यांनी केलेल्या अत्यंत घाण र डा प्रकार आमच्या प्रतिनिधीसमोर कथन केलेले आहे.
याबाबत पिडीत महिलेने पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयास देखील याबाबत भेट दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
केव्हा कुठून चोरुन फोटो किंवा व्हिडीओ घेतला जाईल व त्याद्वारे ब्लॅकमेल करण्यात येईल अश्या भितीचे वातावरण शाळकरी मुली, काम करणाऱ्या महिला यांच्यात निर्माण झाले आहे.
आज सर्वसामान्य व गरीबातील गरीब व्यक्तींच्या मुलांच्या, मुलींच्या हातामध्ये स्मार्टफोन आल्याने पालक वर्गामध्ये देखील भिती निर्माण झाली आहे. याबाबत जनतेने जागृत असणे आज काळाची गरज आहे. शिरपूर तालुक्यातील हे सेक्स स्कॅण्डल ग्रामिण भागातूनच सुरु झाल्याचे वृत्त आमच्या प्रतिनिधीस प्राप्त झाले आहे.
(वाचा सविस्तर भांडाफोड पुढच्या अंकात)
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनि...
-
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री ह भ प गोपाळ महाराज दापोरीकर यांचा कीर्तनाचा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा