Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

शिरपूर तालुक्यात मिनी सेक्स स्कँडल समोर येण्याची शक्यता ! तालुक्यातील प्रतिष्ठित व उच्चभूत समाजातील व्यक्तीचा समावेश ?



शिरपूर (प्रतिनिधी) राज्यातील बलात्कार, लैंगिक अत्याचाराचे सत्र संपण्याचे नाव घेत नाही. एका मागोमाग एक बलात्काराच्या घटना राज्याच्या विविध भागातून समोर येत आहेत. आता शिरपूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. तालुक्यातील उच्चभुत समजल्या जाणाऱ्या समाजातील एका व्यक्तीने बहिणभावाचे नाते तयार करून

त्यास काळीमा फासणारे घाणरडे कृत्य करून मानवी नात्याला दुषीत केले आहे. याच भावाने त्या महिलेचे अश्लील प्रकाराचे व्हिडीओ शुटींग व फोटो काढून ब्लॅकमेल करत त्या महिलेच्या गैरवापर करत अनेकांकडून तिच्या मर्जीविना तिच्यावर बळजबरीने शारिरीक अत्याचार करून घेतले असल्याचे संबंधीत महिलेने आमच्या प्रतिनिधीस माहिती दिली आहे. ही बाब प्रतिष्ठीत

अश्या शिरपूर तालुक्याला काळीमा फासणारी आहे. यात व्यापारी एका नामांकित बँकेतील अधिकारी, शिक्षण घेणारा विद्यार्थी व सदर शेतकरी यांनी त्या महिलेवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समजते. यातून शिरपूर तालुक्यात मिनी सेक्स स्कॅण्डल उघड होण्याची शक्यता दबक्या आवाजात जनतेतून बोलली जात आहे. लवकरच या सर्वांची नावे

जनतेसमोर उघड करणार असल्याचे पिडीत महिलेने तरुण गर्जना प्रतिनिधीस माहिती दिली आहे. याबाबत संबंधीत महिला ही राज्य महिला आयोग, जिल्हा महिला अत्याचार समिती व पोलीसांत केव्हाही तक्रार नोंद करु शकते यात शंका नाही. सदर घटनेचा मागोवा व पाठपुरावा तरुण गर्जना वृत्तपत्रामार्फत घेण्यात येत आहे. (वाचा सविस्तर पुढील अंकात.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध