Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

जामफळ धरणाच्या उत्खननातील डबर गौण खनिजाची चोरी, स्टोन क्रेशर धारक व महसुल अधिका-यांची दिवाळी

   
                       
शिंदखेडा (प्रतिनिधी) सोनगीर जवळ जामफळ धरणाचे काम सुरु असून चालू पावसाळ्यामध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी सर्वसाधारण वीस ते पंचविस फुट खोल व पंधरा फुट रुंद असा अर्धा ते एक किलोमिटरचा परिसर चारी खोदकाम करुन पाणी काढण्यात आलेले आहे. ही पारी खोदकाम करतांना मोठ्या प्रमाणात डषर गौण खनिज बाहेर काढण्यात आले. सदर डबर गौण खनिजाचा क रोणत्याही प्रकारे शासनाने जाहिर लिलाव केलेला नाही. असे असतांना संपूर्ण डबर तेथून चोरुन नेण्यात आलेला आहे. 

मग नेमका हा डबर नेला तरी कोणी? याबाबत सार्वजनिक पाटबंधारे विभाग यांनी नेमकी बघ्याची भूमिका का घेतली? चोरट्यांवर कारवाई का होत नाही? खरे बघितले तर याच परिसरात मोठ्या प्रमाणावर स्टोन केशर मशीन हे अनधिकृत बेकायदेशिरपणे सुरु असून खडीसाठी आवश्यक असलेल्या डबर उत्खननाची कुठलीही शासकीय परवानगी न घेता अवैध मार्गाने उत्खनन सुरु आहे. तसेच ज्या ठिकानी स्टोन केशर सुरु आहेत त्या ठिकाणाचे पर्यावरणाचे पुरेसे शासकीय दाखले उपलब्ध करून घेतलेले नाही. मग सदर जामफळ धरणाचा डबर हा नेमका कोणी चोरुन नेला? कोणत्या मशिनमध्ये गेला व त्याचे खडीत रुपांतर झाले याचा शोध घेणे सार्वज निक पाटबंधारे विभागाचे मुख्य काम आहे. सदर विभागाने तात्काळ चोरट्यांवर कारवाई न केल्यास शासनाचा मोठ्या प्रमाणावर जमा होणारा महसुलापासून वंचित रहावे लागेल. व यास संबंधीत अ धिकारी व कर्मचारी हेच जबाबदार असतील. ज्याअर्थी राजरोसपणे सदर डबर चोरुन नेल्यावरही कोणताही कांगावा धरण बांधकाम अधिका-यांनी केलेला नाही म्हणजेच दाल मे कुछ काला है. शासनाने ई-रॉयल्टी सुरु केली 

असून अत्यंत अल्प प्रमाणात त्यास प्रतिसाद मिळत आहे. म्हणून स्टोन क्रेशर धारक रातोरात खडी फोडून वाहतूक करीत आहे. परिसरातून प्राप्त झालेल्या माहितनूसार शिंदखेडा तालुक्यातील महसुल अधिकारी व खुद्द तहसीलदार साहेब हे रात्रीची गस्त घालीत आहेत. असे असतांना एकही खडी वाहतूक करणारे वाहन जप्त झालेले नाही व त्यांचा पंचनामा झालेला नाही. रात्रीची मोठ्या प्रमाणात स्टोन मशिन सुरु असून खडी वाहतूक सुरू आहे. मग नेमके महसुल अधिकारी हे गस्त कुठे घालतात. यातून एरंडोली पध्दतीने कामकाज चालते असेच म्हणावे लागेल. स्टोन क्रेशर धारक व महसूल अधिका-यांची दिवाळी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. 

तर यांचा मार्फत शासनाची दिवाळखोरी करण्याचा चंग बांधला आहे. तरी या महसुल अधिका-यांना व गस्तीवर असणान्या अधिका-यांना, बेकायदेशिर सुरु असलेल्या स्टोन क्रेशर मशिनरी, खडी वाहतूक वाहने यांना जिल्हा प्रशासन चाप लावणार का? असा खडा प्रश्न परिसरातील जनतेतून येत आहे. (सविस्तर पुढील अंकात)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध