Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
बेकायदेशिर स्टोन क्रेशर धारकांवर कारवाई की,दिवाळी बोनस..नेमके काय? महसुल अधिकारी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार का?
बेकायदेशिर स्टोन क्रेशर धारकांवर कारवाई की,दिवाळी बोनस..नेमके काय? महसुल अधिकारी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार का?
शिंदखेडा (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील सोनगिर हद्दीतील जामफळ धरणाचे बांधकाम सुरु असतांना पावसाळ्यातील साचलेले पाणी काढण्यासाठी पाटचारी खोदकाम करण्यात आले.पाटचारीचा अंदाज घेतल्यास जवळपास पंचवीस फुट खोल व पंधरा फुट रुंद तर साधारण एक किलोमीटर लांष एवढ्या मोठ्या पाटचारीमधुन मोठ्या प्रमाणावर ब्लास्टींग करून डषर बाहेर काढण्यात आला.व साचलेल्या पाण्यास रस्ता तयार करुण देण्यात आला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आलेल्या डबर गौण खनिजा पासून शासनास मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होणार होते मात्र त्याचा कोणताही शासकिय जाहिर लिलाव न करता शासनाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने दिवाळी बोनस पध्दतीने रातोरात मोठ्या प्रमाणावरील गौण खनिज गायष करण्यात आले.
हे गौण खनिज नेमके नेले कोणी? कोणाच्या वरदहस्ताने? कश्यासाठी? या जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शासकीय अधिकारी देणार का? खरे बघितले तर याच परिसरात मोठ्या प्रमाणावर स्टोन क्रेशर मशीन हे अनधिकृत बेक यदेशिरपणे सुरू असून हा डबर नेमका तेथेच तर गेला नाही ना? अशी शंका परिसरातील नागरिकांनी आमच्याकडे व्यक्त केलेली आहे.इतकेच नव्हे तर गस्तीवर असलेले महसुल अधिकारी व पोलीस प्रशासन यांना चोर मार्गाने सुरु असलेल्या गैर व्यावसायीकांकडून वाढीव दिवाळी बोनस मिळत असल्याची शंका-कुशंका परिसरातील सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.स्टोन क्रेशर धारकांनी आदिवासी लोकांच्या जमिनी,वनविभागाच्या वनजमिनी अश्या ठिकाणी अनधिकृतपणे अतिक्रमण करून उत्खनन केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मग असे असतांना शासकिय अधिकायांची डोळेझाक का? परिसरातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत स्टोन क्रेशर मशिन सुरु करून लाखो ब्रास खडी वाहतूक होत आहे.मग ई-रॉयल्टीचे झाले काय? सर्व सामान्य जनतेला दिसलेले सुरु असलेले स्टोन क्रेशर मशिन खडी वाहतूक करणारे वाहने गस्त घालणान्या महसुल अधिकायांना व पोलीस प्रशासनाला का दिसून येत नाहीत? याचा पक्का पुरावा म्हणजे रात्री बेरात्री गौण खनिज वाहतूक करणारी वाहने जप्त करून त्यांचे पंचनामे का करण्यात आलेले नाही? असा खडा सवाल जनतेतून निर्माण झाला आहे. व याची उत्तरे जनतेला मिळतील की,नाही?
(सविस्तर वाचा पुढील अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा