Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१
हेमलता वाडीले यांची महात्मा फुले राज्यस्तरीय नागरी पुरस्कारासाठी निवड
शिरपूर तालुक्यातील आर,सी,पटेल प्राथमिक विद्यालय,रामसिंग नगर येथील उपक्रमशील शिक्षिका हेमलता संदिप वाडीले यांची महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय नागरी पुरस्कार 2021 साठी निवड झाली आहे.महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र,यांच्या पुरस्कार निवड समितीने हेमलता वाडीले यांच्या शैक्षणिक,सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड केली.
दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी शेगाव येथे होणाऱ्या 11 व्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत शिक्षण राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, ब्रिगेडियर सुधीर सावंत ( मा. खासदार तथा अध्यक्ष सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य),सौ मनीषा ताई पवार (अध्यक्षा जिल्हा परिषद बुलढाणा),श्रीमंत भूषणसिंहजीराजे होळकर (अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज, इंदौर),शिक्षक आमदार किरण सरनाईक,आमदार अमित झनक या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
त्याबद्दल त्यांना निवडीचे पत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.यावेळी महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव,जिल्हाध्यक्ष अंबादास घाळगिर,उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

छान, तरूण गर्जना स अनंत हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवा